Viral Video: सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यात कधी काही मजेशीर गोष्टी, तर कधी थरारक घटना पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ ठरवून शूट केले जातात, तर काही व्हिडीओ नकळत कॅमेऱ्यात कैद होतात; जे खूप चर्चेतही येतात आणि लाखो व्ह्युज व लाइक्स मिळवतात. सध्या असाच दोन भावंडांचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. त्यात लहान भाऊ चालता चालता अचानक खाली पडतो, यावेळी भावाला पडलेलं पाहून मोठा भाऊ असं काहीतरी करतो, जे पाहून तुम्हीही कपाळावर हात मारून घ्याल.

भावंडांमधील प्रेम आणि भांडणं जगजाहीर असतात. भावंडं एकमेकांबरोबर क्षणात भांडतात आणि क्षणात पुन्हा एकत्र येतात. ही भावंडं घरात दिवसभर भांडली तरी रात्री एकाच ताटात बसून जेवतात. त्याशिवाय स्वतः एकमेकांबरोबर खूप भांडतील; पण बाहेरची एखादी व्यक्ती आपल्या भाऊ किंवा बहिणीबरोबर भांडत असेल, तर त्यावेळी ती आपल्या भावंडाला साथ देतात. प्रत्येक घरात भावंडांचं असं गोड नातं आपण पाहतो. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतोय, जे पाहून तुम्हालाही तुमच्या भावाची आठवण येईल.

काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घराबाहेर दोन भावंडांमधील मोठा भाऊ बसला असून, धाकटा भाऊ त्याच्याकडे पळत येताना दिसतो. तेवढ्यात अचानक पाऊस पडत असल्यामुळे पळता पळता धाकटा भाऊ जोरात पाय घसरून खाली पडतो. भावाला पडलेलं पाहून मोठा भाऊ मदत करण्यासाठी अजिबात जात नाही, उलट तो धाकट्या भावाकडे पाहून मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो. धाकटा भाऊ स्वतः उभा राहून मोठ्या भावाकडे पाहतो. या व्हिडीओवर अनेक जण या कमेंट्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @marathihasyaa या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि ११ हजारांहून अधिक लाइक्स आल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत.

हेही वाचा: “अरे बापरे, तो आला आणि तिला चक्क…” माकडाने महिलेबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय की, लय भारी हसला हा. तर दुसऱ्या युजरने लिहिलेय की, लहानपणीची आठवण. तर आणखी एकाने लिहिलेय की, मोठे भाऊ असेच असतात. अशा प्रकरे अनेक जण या व्हिडीओवर मिश्कील प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.