Viral Video Man Helps Wife Wear Anklets On Train : पती-पत्नीचे नाते विश्वास आणि प्रेमाच्या आधारावर टिकते. काही वेळा छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. मग पहिल्यांदा बोलायला कोण जाणार या गोष्टीची दोघेही वाट बघत असतात. पण, या लहान सहन गोष्टी विसरून हा दुरावा कमी सुद्धा केला जाऊ शकतो. तसेच प्रेमाच्या बाबतीतही असते. तुमच्या भावना मनात ठेवण्यापेक्षा तुमच्या छोट्या कृतीतून तुम्ही समोरच्यावरचे प्रेम व्यक्त केलं तर त्यालाही तितकाच आनंद होतो. तर आज व्हायरल व्हिडीओत हेच वृद्ध जोडप्याने केलं आहे.
जिश्मा उन्नीकृष्णनने शेअर केलेल्या या व्हिडीओत ती ट्रेन प्रवासाचा आनंद घेत होती. पण, प्रवास करताना तिच्या डोळ्यासमोर एक सुंदर क्षण आला. हा सुंदर क्षण म्हणजे लोअर बर्थवर एक वृद्ध जोडपं बसलेले दिसत होते. आजी स्वतःच्या पायात पैंजण घालण्याचा प्रयत्न करत होती. मग आजोबा हे बघून तिला मदत करण्यास सुरुवात करतात. सुरवातीला ते वाकून पैंजण घालण्याच्या प्रयत्न करत असतात. पण, मग नंतर आजीचा पाय हातात घेऊन तिला पैंजण घालण्यास सुरुवात करतात; जे बघायला खूपच सुंदर वाटते आहे.
अशाप्रकारे प्रेम व्यक्त केलं पाहिजे… (Viral Video)
आत्ताची जोडपी खांद्यावर हात ठेवायला, हात पकडून चालायला, एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवायला सुद्धा अजिबात मागे-पुढे बघत नाहीत. पण, पैंजण घालेपर्यंत आजी ट्रेनमध्ये उपस्थित येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांकडे चोरून बघत असतात. कोणी आपल्याकडे बघत तर नाही आहे ही भीती, लाजणं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. पण, आजोबा मात्र अगदी प्रेमाने तिच्या पायात पैंजण घालत होते. हा क्षण त्या महिला प्रवाशाने पाहिला आणि व्हिडीओ शूट करून तिच्या अकाउंटवरून शेअर केला आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @jishma_unnikrishnan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “मला वाटले की, मी फक्त प्रवास करत होते. पण, एका क्षणात आयुष्यभराचे प्रेम बरोबर घेऊन चालले आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा हा खास क्षण पाहून भारावून गेले आहेत आणि “अशाप्रकारे प्रेम व्यक्त केलं पाहिजे”, “वय वाढलं तरीही दोघांमधलं प्रेम असंच राहीलं पाहिजे”, आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.