Viral Video Government School Teacher Controversy : शिक्षकांमुळे मुलांचे भविष्य घडतात, असे म्हणतात. पण, जर हेच शिक्षक मुलांचे भविष्य खराब करण्याच्या प्रयत्न करीत असतील तर… छत्तीसगडमधील बलरामपूर येथील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने असेच काहीतरी केले आहे. पाच वर्षांपासून सगळ्यांनाच गुंडाळून ठेवण्याचे काम त्याने केले आहे. इंग्रजी शिकवणारा हा शिक्षक त्याला साधे, सोपे इंग्रजीतले शब्दही लिहिता येत नव्हते. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल आता चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडीओ छत्तीसगडमधील बलरामपूर येथील एका सरकारी शाळेचा आहे; जिथे तपासणी सुरू आहे. या तपासणीदरम्यान व्हिडीओ रेकॉर्ड केला जात आहे. तर एका इंग्रजी शिक्षकाला फळ्यावर ११ आणि १९ ची स्पेलिंग इंग्रजीत लिहिण्यास सांगण्यात आले होते. पण, त्यांनी चुकीची स्पेलिंग फळ्यावर लिहिली. जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, स्पेलिंगबद्दल तुम्हाला खात्री आहे का? तेव्हा शिक्षकाने अगदी आत्मविश्वासाने हो म्हटले आणि इथूनच चिंता आणखीन वाढत गेली.

स्पेलिंग लिहिताना उडाला गोंधळ (Viral Video)

त्यानंतर स्पेलिंग पुढे अंकात लिहून वर्गातील विद्यार्थ्याला या दोन्ही स्पेलिंग वाचून दाखवण्यास आणि शिकवण्यास सांगण्यात आले. शिक्षक फळ्यावर चुकीच्या लिहिलेल्या स्पेलिंग विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात करतात. तितक्यात कोणीतरी ११ ची स्पेलिंग चुकीची आहे, असे म्हणतो. मग शिक्षक गोंधळून जातात आणि फळ्याकडे बघायला सुरुवात करतात; जे पाहून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे, असे तुम्हाला नक्कीच जाणवेल. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओ व्हायरल होताच सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. जर शिक्षकाला साध्या शब्दांच्या स्पेलिंगही येत नसतील, तर त्याला कामावर कसे ठेवण्यात आले याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकावर कोणतीही कारवाई झाल्याचा अहवाल अद्याप तरी समोर आलेला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @white_knighttt या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘छत्तीसगडमधील बलरामपूर येथील एका सरकारी शाळेतील शिक्षकाला इंग्रजीत शब्द लिहिता येत नव्हते आणि हेच तुम्ही आमच्या मुलांना शिकवता?’,; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.