Family Celebrate Government Job Selection Moment : भारतामध्ये लाखो तरुण सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न उराशी बाळगतात. ही नोकरी केवळ भविष्यात स्थिरता देत नाही तर तुमच्या सन्मानाचे प्रतीक सुद्धा असते. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी अनेक जण धडपड करत असतात. मात्र हे स्वप्न साकारताना अनेक जवळची माणसे आपल्यापासून दूर होतात, काही जण मुद्दामून बोलणे बंद करतात. पण, या सगळ्यांना यशस्वी होत दाखवण्याचे धाडस खूप कमी लोक करतात. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
@ishwar_0809 या इन्स्टाग्राम युजरची मुंबई पोलीसमध्ये निवड झाली आहे. भरती प्रक्रियेदरम्यान त्यांना वेगववेगळ्या गोष्टींद्वारे सराव, परीक्षा द्यावा लागतात. त्यामुळे हा प्रवास त्यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. त्यांची मेहनत, जिद्द त्यांच्या कुटुंबाने सुद्धा पाहिलेली असते. त्यामुळे सरकारी नोकरीसाठी निवड होताच त्यांनी गणपती बाप्पाच्या आगमनासारखा गुलाल उडवून दिवस साजरा केला आहे. तर @ishwar_0809 इन्स्टाग्राम युजर दारात येऊन उभा राहतो. तसे लगेच घरातील काही मंडळी मिळून त्यांच्यावर गुलाल उडवतात.
वाक्य नाही आयुष्याची लक्ष्मण रेखा आहे (Viral Video)
अनेक जण तुला काही जमणार नाही, तुझ्याने एखादी गोष्ट होणारच असे म्हणून मोकळे होतात. पण, आपल्याला न जमणारी गोष्ट अशाच लोकांना करून दाखवण्यात एक वेगळाच गर्व असतो नाही का… तर व्हायरल व्हिडीओतील @ishwar_0809 यांना सरकारी नोकरीवरून अनेक टोमणे मारले असतील. त्यामुळे मुंबई पोलीसमध्ये निवड होतंच त्यांनी खास व्हिडीओ बनवून ‘सगळ्याच जखमा हळदीने बऱ्या होत नसतात. अपमानाच्या काही जखमा सरकारी नोकरीच्या गुलालाने बऱ्या करायच्या असतात’ असा मजकूर व्हिडीओवर दिला आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
https://www.instagram.com/ishwar_0809
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ishwar_0809 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. “हा दिवस बघण्यासाठी खूप मोठी तपश्चर्या केली आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “भावा तुझ्या जिद्दीला, मेहनतीला सलाम आहे’, “खूप खूप अभिनंदन साहेब”, “शेवटी शेवट गोड होतो”, “कठीण परिश्रमानंतर जे मिळते त्याला पॉवर म्हणतात”, “हे वाक्य आहे ना भावा ते वाक्य नाही लक्ष्मण रेखा आहे आयुष्याची” , “भ्रष्टाचार न करता देशसेवा करावी ह्याच शुभेच्छा” ; आदी भावना व्हिडीओबद्दल नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये मांडल्या आहेत,