Viral Video Family Found Grandmothers Real Birthdate : पूर्वीच्या काळी लोकांना खरी जन्मतारीख ही माहितीच नसायची. शाळेत टाकण्यासाठी म्हणून १ जून ही जन्मतारीख सगळीकडे सांगितली जायची, त्यामुळे शालेय दाखल्यावर हीच तारीख असल्याने तो जन्माचा पुरावा म्हणून पुढे सगळीकडे वापरला जायचा. त्यामुळे मूळ जन्मतारीख ठाऊक नसलेल्यांची जन्मतारीख ही १ मे किंवा १ जून असून त्यांचा त्या दिवशी वाढदिवस साजरा होतो. पण, आज एका कुटुंबाने त्यांच्या आजीची खरी जन्मतारीख शोधून काढून हा दिवस अगदी खास पद्धतीत साजरा केला आहे.

आजीची जन्मतारीख समजताच ८६ वा वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू झाली. घर अगदी लाल फुग्यांनी सजवले. त्यानंतर केक कापण्यासाठी आजीला सोफ्यावर बसवले. सगळ्यांनी हॅप्पी बर्थडे गाणे गाण्यास सुरुवात केली आणि आजीसुद्धा निरागसपणे टाळ्या वाजवायला लागली. मग घरच्या मंडळींनी तिला ‘अगं तू केक काप’ असे सांगितले. त्यानंतर केक भरवून सगळ्यांनी आजीचे तोंड गोड केले आणि अशाप्रकारे आजीचा वाढदिवस साजरा करण्यात आला; जे पाहून तुमचेही डोळे नक्कीच पाणावतील.

किती तो साधेपणा… (Viral Video)

म्हातारपण दुसरे बालपण असते असं म्हणतात, त्यामुळे त्यांना मुलांचा पैसा नाही तर प्रेम आणि आपुलकी हवी असते. हीच आपुलकी, प्रेम कुटुंबातील सदस्यांनी वाढदिवसाची तारीख शोधून, वाढदिवस उत्सवासारखा साजरा करून आजीसाठी दाखवली; हे पाहून आजी भारावून गेली. वाढदिवस साजरा करण्यासाठी घेतलेली मेहनत पाहून तिने नातवाच्या पाठीवर मायेची थाप मारली आणि वर देवाकडे बघून हात जोडले; जे पाहून तुमच्याही अंगावर नक्कीच काटा येईल.

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by Photographer ?? (@sanjitshinde_017)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sanjitshinde_017 आणि @thesankshine या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “आजीच्या आठवणी होत्या, पण वाढदिवसाची तारीख नव्हती… आज ती तारीख मिळाली आणि ८५ वर्षांनी मिळालेला आजीचा ८६ वा वाढदिवसाचा क्षण साजरा केल्याशिवाय राहवलं नाही”; अशी कॅप्शन व्हिडीओला नातवाने दिली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून अक्षरशः निःशब्द झाले आहेत आणि “आमच्याकडे तारीख आहे, पण आजी नाही”, “निःशब्द”, “किती तो साधेपणा…, आहे तोपर्यंत प्रेम करत जा व्यक्तींवर”; आदी भावना कमेंटमध्ये मांडताना दिसत आहेत.