Viral video: गेल्या आठवडाभर दिवाळीचा उत्साह देशभर पाहायला मिळाला. फराळ, रांगोळी, दिवे आणि फटाक्यांच्या आतषबाजीची सर्वत्र धामधूम सुरु होती. यासोबत मजा असते ती फटाके फोडण्याची. भरपूर फटाके फोडण्याचा आनंद अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे लुटत असतात. मात्र याच आनंदावर विरजण घातलं ते शेजाऱ्यांमध्ए झालेल्या भांडणाने आणि क्षणात अनर्थ घडला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये दोन शेजाऱ्यांमध्ये फटाक्यांवरून जोरदार भांडण झालं. फटाके फोडण्याचा राग आल्यानं एका शेजाऱ्यानं दुसऱ्या शेजाऱ्यावर अक्षरश: बाल्कनीमधून गॅस सिलिंडर फेकल्याची घटना घडलीय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फटाके आणि दिवाळीचे नाते दृढ आहे. फटाके फोडणे ही आपल्या पूर्वजांनी बाटलीबंद भावना मोकळ्या करण्यासाठी घालून दिलेली परंपरा मानली जाते. साचलेल्या भावना, नैराश्य, राग, तिरस्कार यांचा कायमस्वरूपी निचरा व्हावा आणि माणसाचे आयुष्य फटाक्यांचा स्फोटाप्रमाणे प्रकाशमान व्हावे हा फटाके उडविण्यामागील उद्देश मानला जातो. परंतु, फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनिप्रदूषण होत असल्याने फटाके उडविण्यावर बरेच जण आक्षेप घेतात. असाच आक्षेप घेतल्यानं काय झालं ते व्हिडीओमध्ये पाहा.

संतापलेल्या व्यक्तीने छतावरून सिलेंडर फेकला

व्हायरल व्हिडिओमध्ये एक परिसर दिसत आहे, दिवाळीमुळे सगळ्या घरांना रोषणाई केल्याचं दिसत असून एकीकडे जोरदार भांडण सुरु आहे. एक महिला आणि एक पुरुष एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत आणि गॅस सिलिंडर जमिनीवर पडलेला दिसत आहे. मात्र तुम्ही व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकले तर समजले की फटाके फोडायचे नाही खाली म्हणून एका व्यक्तीने घराच्या गॅलरीमधून खाली सिलेंडर फेकून मारलेला आहे. सुदैवाने हा सिलेंडर जमीनीवर पडला त्यामुळे कुणालाही हाणी झाली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> इथे माणुसकी मेली! पतीचा गोळीबारात मृत्यू, गरोदर पत्नीला रक्त साफ करण्यास भाग पाडलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

नेटकरीही संतापले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर @gharkekalesh या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,”फटाके फोडण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद, संतापलेल्या व्यक्तीने सिलेंडर छतावरून खाली फेकले, व्हिडिओ व्हायरल” असे लिहिण्यात आलेले आहे.. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “हे फार चुकीचे आहे यामुळे किती मोठा अनर्थ होऊ शकतो याची कल्पना आहे का?” तर आणखी एकानं “क्षणभराचा राग अन् आयुष्यभर पश्चाताप होईल असं करु नका.” असं म्हंटलंय.