Viral Video Father Refuses To Buy iPhone 17 Pro Max : महागड्या आयफोनची तरुण मंडळींमध्ये प्रचंड क्रेझ दिसून येते. काही दिवसांपूर्वी आयफोन खरेदी करण्यासाठी इलेक्ट्रॅानिक उपकरणांच्या दुकानाबाहेर खरेदीदारांची रांग लागलेली दिसत होती. शाळा, कॉलेजला जाणाऱ्या तरुण मंडळींचे तर आयफोन घेणं म्हणजे स्वप्न असते. आई-बाबांचा आदर करणं किंवा त्यांना काय हवं-नको ते बघणं राहिला बाजूलाच आयफोनसाठी ते आई-वडिलांकडे भांडतात, रागावतात आणि नको तो हट्ट करून मोकळे होतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एका तरुणीने आयफोन घेण्यासाठी हद्दच पार केली आहे.

स्वतःला “ब्युटी क्वीन ऑफ लखीमपूर” असे म्हणणाऱ्या उत्तर प्रदेशातील एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तिच्या वडिलांनी तिला नवीन आयफोन खरेदी करण्यास नकार दिला. कारण – अलीकडेच तीन महिन्यांपूर्वी तरुणीला तिच्या बाबांनी आयफोन १६ भेट म्हणून दिला होता. पण, आता आयफोन १७ प्रो नुकताच लाँच झाला आणि त्याचा रंग तरुणीला खूप आवडला आहे. त्यामुळे २१ ऑक्टोबर रोजी तिचा वाढदिवस असल्यामुळे हा नवीन आयफोन तिला घ्यायचा आहे.

तिला एकही पैसाही देऊ नका (Viral Video)

पण, तिच्या वडिलांनी पुन्हा एकदा आयफोन घेण्यास नकार दिला आहे. कारण – नुकताच लाँच झालेला आयफोन १७ प्रो मॅक्स १.४९ लाख रुपयांना भारतात विकला जातो आहे. तर हा आयफोन खरेदी करण्यासाठी पैसे मागण्यासाठी हा मदत मागणारा व्हिडीओ तिने बनवला आहे. एवढेच नाही तर तिने तिच्या फॉलोअर्सकडून ॲपल स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एक, दोन, तीन किंवा अगदी चार रुपये देण्याची मदत मागितली आहे. ती व्हिडीओत म्हणतेय “जर तुम्ही सर्वांनी प्रत्येकी एक, दोन, तीन किंवा चार रुपये मदत केली; तर मी हा फोन खरेदी करू शकली तर तुमचे मनापासून आभार मानेन. यामुळे माझे स्वप्न साकार होईल. खरं सांगायचं तर, मला हा फोन इतका आवडतो की त्याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत”.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Sajid7642 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी “पुस्तके आणि अभ्यासाशी संबंधित इतर गोष्टींसाठी पैसे मागत नाहीत? तिला एकही पैसाही देऊ नका,” “क्राउड फंडिंगद्वारे युट्यूबर श्रीमंत होतात पण जेव्हा एखादा गरीब माणूस असे करतो तेव्हा ते एक समस्या बनते,” “आयफोन घेणे तिचे स्वप्न आहे, ही कोणत्या प्रकारची पिढी आहे, स्वतःच्या पैशातून पालकांसाठी काहीतरी खरेदी करण्याचे स्वप्न असले पाहिजे,” “कृपया… अशा लोकांना कधीही तुमच्या कष्टाचे पैसे देऊ नका. एकवेळ गरीब लोकांना द्या; जे उदरनिर्वाहासाठी संघर्ष करत आहेत. आणि ही महिला, जी तिचा मेकअप दाखवून पैसे मागत आहे, ती किती निर्लज्ज आहे. स्वाभिमानी लोक कोणाकडूनही पैसे किंवा मदत मागत नाहीत”; आदी अनेक कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.