Mumbai Local AC Train Fight Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये रोज लाखो प्रवासी प्रवास करतात, अनेकदा प्रवासादरम्यान प्रवाशांमध्ये सीटवरून वादावादी, भांडण, तर कधी मारामारीच्या घटना घडतात. त्यामुळे मुंबई लोकल आणि वाद, भांडण, मारामारी हे आता समीकरणचं झालं आहे. विशेष म्हणजे गर्दीच्या वेळी या घटना सर्रासपणे घडताना दिसतात. त्यात आता मुंबईतल्या एसी लोकलमधील आणखी एक घटना समोर आली आहे, ज्यात एक प्रवासी दुसऱ्या प्रवाशाला मारण्यासाठी अंगावर धावून जाताना दिसत आहे. एसी लोकलमध्ये रांगेत चढण्यावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना मंगळवारी (२० मे) भाईंदर – दादर एसी लोकल ट्रेनमध्ये सायंकाळच्या वेळी घडल्याचे सांगितले जात आहे. सर्व प्रवासी रांगेत एसी लोकलमध्ये चढत होते; पण एक प्रवासी सर्व प्रवाशांना धक्का देऊन रांग सोडून ट्रेनमध्ये चढला आणि त्याच वेळी त्याचा मोबाईल हातातून खाली पडला, ज्यामुळे तो इतर प्रवाशांवर जोरजोरात ओरडू लागला. तो मारण्यासाठी एका प्रवाशाच्या अंगावर चक्क धावत गेला; पण इतर प्रवाशांनी त्याला अडवले.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला तरुण अतिशय रागात समोरच्या व्यक्तीसह जोरात वाद घालतोय. यावेळी इतर प्रवासी त्याला बाजूला करीत समजावण्याचा प्रयत्न करतात; पण तो त्यांच्याबरोबरही जोरजोरात ओरडून बोलू लागतो. हे पाहून तिसरा एक प्रवासी त्याला जोरात धक्का देतो. त्यावरून वाद आणखी वाढतो. अखेर चौथा प्रवासी मध्यस्थी करून, त्या तरुणाला शांत करतो. दरम्यान, हा प्रकार प्रवाशांसाठी काही नवीन नाही. अनेकांनी या प्रसंगाचा व्हिडीओ मोबाईलद्वारे शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.

View this post on Instagram

A post shared by MiraBhayanderKar™ (@mirabhayanderkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एसी लोकल ट्रेनमधील भांडणाचा व्हिडीओ @mirabhaynderkar नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे आणि त्यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, यात नवीन काही नाही. हे रोजचंच झालं आहे हे. दुसऱ्याने लिहिले की, काही लोकांना जीवापेक्षा मोबाईल महत्त्वाचा असतो. माझी विनंती आहे की, प्रवासादरम्यान लोकांनी कृपया आपला मोबाईल हातात न ठेवता, बॅगमध्ये ठेवावा.