Viral Video Friend Surprise Entry For Groom : मैत्री हे जगातलं सर्वात सुंदर नाते मानले जाते; जे कोणत्याही स्वार्थाशिवाय असते. जेव्हा संपूर्ण जग आपल्याविरोधात उभे असते, तेव्हा मित्रच आपल्यापाठीशी उभे असतात. त्यामुळे आठवड्यातून किंवा अगदी महिन्यातून एकदा जरी त्यांना भेटले तरीही मन प्रसन्न होऊन जाते. त्यामुळे मित्रांची फक्त उपस्थिती आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन येते असे म्हणायला हरकत नाही. तर आज सोशल मीडियावर सुद्धा असेच काहीसे उदाहरण दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे
@retro.click_s या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत एका मित्राचे लग्न असते. तर नवऱ्या मित्राला काहीच कल्पना नसते की, त्याचे मित्र काहीतरी त्याला भन्नाट सरप्राईज देण्याच्या तयारीत आहेत. नवरदेवाचा एक खास मित्र त्याच्या लग्नात काही कारणांमुळे उपस्थित राहणार नसतो. पण, जेव्हा सगळे मित्र ग्रुप फोटो काढण्याच्या तयारीत असतात. तितक्यात नवरदेवाचा खास मित्र मागे येऊन ग्रुप फोटोत उभा राहतो. त्यानंतर ग्रुप फोटो नवरदेवाला दाखवला जातो.
लग्नाचा फोटो आयुष्यभराच्या एका सुंदर आठवणीत बदलला (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, लाडका मित्र आपल्या दुसऱ्या खास मित्राला सरप्राईज देण्यासाठी त्याच्या लग्नात येतो. नवरदेव गुपचूप येऊन स्टेजवर उभा राहतो. त्यानंतर ग्रुप फोटो नवरदेवाला दाखवताच तो थेट मागे बघतो. मित्र नवऱ्याला येऊन मिठी मारतो आणि त्याला उचलून घेतो. एवढेच नाही तर नवरदेवाच्या डोळ्यांत आपल्या लाडक्या मित्राला पाहून पाणी सुद्धा येते आणि स्टेजवर एकच उत्साहाचे, आनंदाचे वातावरण दिसते. एकदा बघाच हा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @retro.click_s आणि @indiawithoutpolitics या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “जेव्हा लग्नाचा फोटो आयुष्यभराच्या एका सुंदर आठवणीत बदलतो” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “पुरुष एकमेकांशी प्रेमाने वागतात आणि एकमेकांबद्दल वाईट सुद्धा बोलत नाहीत” आदी कमेंट्स तर काही जण त्यांच्या मित्र-मैत्रिणींना कमेंटमध्ये टॅग करताना दिसून आले आहेत…