German Shepherd Protects Children Viral Video : श्वानप्रेमींची आपल्या देशात कमी नाही. मुक्या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारे अनेक जण त्यांना स्वतःच्या जीवनातील महत्वाचा भाग समजतात. पण, कधी कधी दुसऱ्या व्यक्तीसाठी हेच भटके, मुके प्राणी धोकादायक ठरतात. पण, आजचा पाहून कदाचित तुमचे मन बदलून जाईल. व्हायरल व्हिडीओत एका पाळीव प्राण्याने भटक्या श्वानपासून चिमुकल्यांचे संरक्षण केलं आहे.
व्हिडीओतील घटना कधी आणि कुठे घडली याबद्दलची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. एका रहिवासी परिसरात रेकॉर्ड केलेल्या या फुटेजमध्ये जर्मन शेफर्ड बाल्कनीत शांतपणे बसलेला दिसतो. यादरम्यान तो रस्त्यावर लक्ष ठेवून असतो. मुलांचा एक ग्रुप खेळत असताना अचानक त्यांचे लक्ष एका भटक्या श्वानाकडे जाते. कोणताही संकोच न करता, तो बाल्कनीतून उडी मारतो आणि मुलांच्या मागे येणाऱ्या भटक्या श्वानामागे धाव घेतो. कोणत्याही धोक्याची जाणीव नसलेली छोटी मुले पळत राहतात, तर जर्मन शेफर्ड त्या भटक्या श्वानाला पळवून लावत असतो.
माणसांपेक्षा जास्त श्वान निष्ठावान असतात (Viral Video)
सिनेमात एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी ज्याप्रकारे हिरो एंट्री घेतो आणि इतर मंडळी अगदी थक्क होऊन फक्त बघत राहतात. अगदी त्याचप्रमाणे या भटक्या श्वानाने चिमुकल्यांचा जीव वाचवण्यासाठी एंट्री घेतली आहे. चिमुकले खेळत असताना भटका श्वान त्यांच्या मागून धावत येत असतो. हे वेळीच जर्मन शेफर्ड श्वान बघतो आणि चिमुकल्यांचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतो. श्वानाने कशाप्रकारे चिमुकल्यांचा जीव वाचवला एकदा व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. श्वानाने दुसऱ्या श्वानपासून मुलांना वाचवण्यासाठी सुपरहिरोसारखी उडी मारली” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “श्वान माणसांपेक्षा जास्त निष्ठावान असतात, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे” तर दुसऱ्याने टिप्पणी केली, “शाब्बास डॉगेश भाई”, “श्वानाने निष्ठा दाखवली आणि मुलांना वाचवले”, “मुलांचा खरा अंगरक्षक”, “सुपर हिरोंना कोणत्याही आऊटफिटची गरज नसते” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.