Viral Video : शाळा, कॉलेज म्हटलं की, मैत्री, मजा, अभ्यास, खेळ हा सर्व गोष्टी आल्याच; पण अनेकदा शाळा, कॉलेजांमध्ये दोन गटांमध्ये हैदोस, मारामारी, भांडणंदेखील पाहायला मिळतात. अशी भांडणं अनेकदा मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अनेकदा क्षुल्लक गोष्टींवरून झालेले हे वाद पोलिस ठाण्यापर्यंतदेखील जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; पण, त्यामध्ये मुलं मारामारी करीत नसून मुली मारामारी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून, नेटकरी त्यावर अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडीओ नजरेस पडत असतात; ज्यात कॉमेडी व्हिडीओ, रील्स, गाणी यांसारख्या बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात. मात्र, अनेकदा सोशल मीडियावर मारामारी, भांडणाचे व्हिडीओदेखील खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील मोठ्या प्रमाणात हाणामारी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका पार्कबाहेर आधीपासूनच दोन गटांमध्ये काहीतरी वाद झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर त्यातील एक मुलगी एका लहान मुलाला चिडवते. त्यावेळी अचानक दुसरी मुलगी मागून येऊन त्या मुलीचे केस ओढते. त्यावेळी आणखी काही जण एकत्र येऊन भिडतात. यावेळी मुली एकमेकींचे केस ओढतात, एकमेकींना बोचकारतात. इतकंच नव्हे, तर एकमेकांना पायानं लाथादेखील मारतात. व्हिडीओच्या शेवटपर्यंत या मुलींची मारामारी पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: क्या चोर बनेगा रे तू ! चोरी करायला आला अन् AC च्या हवेत झोपला; PHOTO पाहून माराल कपाळावर हात
पाहा व्हिडीओ:
पाहा व्हिडीओ:
पुढे याच व्हिडीओचा पुढचा भागदेखील शेअर करण्यात आला आहे. त्यामध्येदेखील मारामारी करीत या सर्व मुली जमिनीवर लोळताना दिसत आहेत. दरम्यान, या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sanukhan9094 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करीत खाली कॅप्शनमध्ये, “मायावती पार्कमधील सीन” असं लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओवर एक मिलियनहून अधिक व्ह्युज आणि ३० हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे.
त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय की, यांच्यामध्ये कोण जिंकलं? तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “क्लिनिक प्लस शाम्पूची जाहिरात.” आणखी एकानं लिहिलंय, “यांना पाहून असं वाटतंय की, टकल्या लोकांची मजा आहे.” तर आणखी एकानं लिहिलंय, “भारतीय नारी सब पर भारी.” तर आणखी एकानं लिहिलंय, “वाह! काय सीन आहे.”