Funny dance video: लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि आठवणींचा क्षण. प्रत्येक जोडपं आपल्या लग्नाला खास बनवण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतं. कुणी खास एंट्री घेतं, कुणी गाणं गातं, तर कुणी स्टेजवर धमाल डान्स करतं. पण, कधी कधी ही धमाल इतकी भन्नाट असते की, सगळ्यांचं लक्ष फक्त त्या क्षणाकडे वळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात नवरदेवाचा ‘खतरनाक’ डान्स पाहून सर्वच दंग झाले आहेत.
हा व्हिडीओ एका लग्नसोहळ्यातील आहे. @mr.nadan_parinda नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये स्टेजवर नवरी-नवरदेव आणि दोन्ही कुटुंबांतील काही सदस्य उभे दिसत आहेत. नवरीची एंट्री झाल्यानंतर नवरदेव अचानक जुबिन नौटियालच्या लोकप्रिय गाण्यावर “मेरी जिंदगी है तू” यावर डान्स करायला सुरुवात करतो. त्याचा डान्स पाहून नवरी तर लाजतेच; पण तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईक मात्र मोठ्याने ओरडू लागतात. नवरदेवाच्या हालचाली आणि त्याचा आत्मविश्वास पाहून सगळेच थक्क होतात. काहींना तो डान्स आवडतो, तर काहींना वाटतं की, तो थोडा जास्तच ओव्हर झाला.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, नवरदेव आपल्या लग्नाच्या स्टेजवर अगदी उत्साहाने नाचतो आहे. तो ज्या पद्धतीने नाचत आहे त्याची लाज देखील त्याला वाटत नाही उलट तो इतक्या आत्मविश्वासाने नाचतो की, ते पाहून लोकांनाही हसू आवरत नाही. नवरी चकित झालेली दिसते; पण ती तिच्या चेहऱ्यावरील हास्य लपवू शकत नाही. या व्हिडीओनं इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला असून, हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
पाहा व्हिडिओ
या व्हिडीओवर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, “मृत्यू आला तरी असा आत्मविश्वास बाळगू नका.” दुसऱ्यानं म्हटलं, “ना डान्स आला, ना लाज वाटली.” तिसऱ्यानं तर गंमतीत लिहिलं, “पहिलं जेवून घेतो, बारात कधीही परत येऊ शकते.” आणखी एकानं विचारलं, “शेवटी लग्न झालं की नाही?” तर दुसऱ्यानं म्हटलं, “नाचतो तो आहे; पण मला लाज वाटतेय.” इतकंच नाही, एका युजरनं तर हसत लिहिलं, “याच्यानंतर मुलगी स्वतःची डोली उचलून गेली असणार!”
हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी असला तरी त्यातून हे नक्की दिसून येतं की, सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक क्षण व्हायरल होऊ शकतो. लोक आता लग्नात फक्त विधींपुरते मर्यादित राहत नाहीत, तर तो क्षण संस्मरणीय बनवण्यासाठी काहीतरी खास करायलादेखील आवडतात. या नवरदेवाचा अनोखा डान्स नक्कीच त्याचं लग्न सर्वांच्या लक्षात ठेवेल.
