Viral Video: लग्नसमारंभ म्हटलं की नाच-गाणी, मजा-मस्ती, दंगा पाहायला मिळतोच. लग्नातील विविध प्रथांमध्ये खूप गमतीशीर गोष्टी पाहायला मिळतात. लग्नात हार घालण्यावरूनही अनेकदा गोंधळ उडतो; तर कधी नवऱ्या मुलाचे बूट चोरण्यावरूनही राडा झालेला पाहायला मिळतो. अनेकदा काही लग्नांमध्ये वर पक्ष आणि वधू पक्षामध्ये भांडणं झालेली पाहायला मिळतात. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही तरूण मित्राच्या हळदीत जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर सध्या लग्न समारंभातील व्हिडीओचा धुमाकूळ पाहायला मिळतोय. कधी नवरा-नवरीचे व्हिडिओ तर कधी लग्नात सहभागी मित्रमंडळींचा धकामेदार डान्स परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मित्राच्या हळदीत सहभागी झालेल्या मित्राच्या डान्सचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मित्राच्या हळदीमध्ये काही तरूण स्टेजवर जाऊन जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. यावेळी ते “उडू उडू झालंया” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स पाहू नेटकरीही अनेक कमेंट्स करत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @yashance या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत आणि यावर अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय अनेक नेटकरीही यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “मित्र असावे तर असे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “खूपच सुंदर नाचले हे”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “याला बोलतात डान्स”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “काय भारी नाचले राव”