Viral Video Homeless Man Focused On Studies : शाळेतील मुलांना गृहपाठ करण्याचा भरपूर कंटाळा असतो. हात दुखतो आहे, भूक लागली आहे, खेळायचं आहे, झोप आली आहे अशी अनेक कारणे देऊन अनेक जण अभ्यास करणे टाळतात. मग आई-बाबा “ज्यांना खरोखर अभ्यास करायचा असतो ते कुठेही अभ्यास करू शकतात” हे वाक्य अनेकदा आपल्या बोलून दाखवतात. तर व्हायरल होणारा हा व्हिडीओ याच वाक्याचे उदाहरण दाखवतो आहे; जे पाहून मुलांना काही राग येईल तर पालक अगदी आनंदी होऊन जातील.
एक अज्ञात व्यक्ती मेट्रो स्टेशनजवळील एका खांबाखाली बसली आहे. त्याने फक्त शॉर्ट्स घातलेली असते. एवढेच नाही तर राहायला घर नसून, खायला अन्न नसून तो पुस्तक वाचून वहीमध्ये नोट्स लिहून काढताना दिसत आहे. जेव्हा कॅमेरामधून कोणीतरी आपल्याला शूट करतो आहे हे पाहिल्यावर तो वहीमध्ये काय लिहिलं आहे ते व्हिडीओत दाखवताना दिसतो आहे. तिथून जाणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने हा क्षण त्याच्या कॅमेरात कैद करून घेतला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
काही जणांकडे अभ्यास करण्यासाठी पैसा असतो. पण, ते अभ्यास करत नाहीत. तर अनेक जणांच्या मनात अभ्यास करण्याची भरपूर इच्छा असते. पण, परिस्थिती त्यांच्या आड येते. तर आज व्हायरल व्हिडीओत सुद्धा तसेच काहीसे पाहायला मिळाले आहे. परिस्थिती बिकट असताना देखील अभ्यास करण्याचा त्याचा छंद काही कमी झाला नाही असे चित्र दिसते आहे. तसेच व्हिडीओ काढणाऱ्याला सुद्धा आपण कसा अभ्यास करतो आहे हे दाखवताना दिसतो आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @thewhatup या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये “बेघर माणूस मेट्रो स्टेशनच्या बाहेर अभ्यास करताना दिसला” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी कौतुक तर काही जण विनोद करताना दिसत आहेत. तसेच काही जण “ज्याला मिळतं त्याला किंमत नसते”, “आई-बाबा मोबाईल स्क्रोल करताना त्यांनी हा व्हिडीओ अजिबात पाहू नये असे घाबरून व्हिडीओखाली कमेंट करताना दिसून आले आहेत.
