Viral Video Shows Which Banana Is Original : भाजी, फळ असो किंवा आणखीन काही मार्केटमधून प्रत्येक गोष्ट विकत घेताना त्याचे बारकाईने निरीक्षण करावे लागते. कारण – यामुळे पैशांचे नुकसान तर होतेच. पण, त्याचबरोबर कीड लागलेली किंवा खराब झालेली फळे, भाज्या विकत घेतल्यामुळे आरोग्याचेही नुकसान होते. त्यामुळे केळी बनावट आहेत की नाही हे ओळखण्यासाठी एका इन्स्टाग्राम युजरने जबरदस्त ट्रिक दाखवली आहे.

भूक लागल्यावर, वजन वाढवण्यासाठी तर जिमला जाणारी बरीच मंडळी केळ्यांचे सेवन करतात. त्यामुळे आपण आवर्जून केळी विकत घेतो. पण, कधी कधी ही केळी खराब असतात, आतून त्यांना कीड लागलेली असते. त्यामुळे आपण मार्केटमधून योग्य केळी आणतोय का हेही जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे.तर आज एका इन्स्टाग्राम युजरने ओरिजिनल आणि बनावट केळी कशी ओळखायची याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी केळी घेताना नक्की तुम्ही काय बघितलं पाहिजे याची तुम्हाला कल्पना येईल.

@actor.amol.bidave इन्स्टाग्राम युजरने प्रात्यक्षिक दाखवत ओरिजनल केळ्यांच्यावर भरपूर काळे ठिपके असतात आणि पिकवलेली केळी पूर्ण प्लेन पिवळ्या रंगाची असतात असे सांगितले. त्याचप्रमाणे पिकवलेली केळी दाखवत जेव्हा ही केळी तुम्ही उघडता ती आतून संपूर्ण खराब झालेली असतात आणि खाण्याजोगी पण नसतात असे आवर्जून सांगितले. अशी केळी आपण विकत घेतो आणि मग आजारी पडतो. त्यामुळे मार्केटमधून केळी विकत घेताना आपण सगळ्यांनीच ही गोष्ट अगदी बारकाईने बघितली पाहिजेत.

व्हिडीओ नक्की बघा…

डुप्लिकेट केळी खा नाहीतर केळी खायचंच सोडून द्या (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @actor.amol.bidave या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “केळी विकत घेताना सावध राहा” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ बघून “एक तर डुप्लिकेट केळी खा नाहीतर केळी खायचं सोडून द्या. कारण – बाजारात बनावट केळी मिळतात” , “आम्ही कच्ची केळी आणतो…. घरी २/३ आठवड्यात पिकतात”, “काल मला पण अशीच केळी भेटली . बर झालं सांगितलं भाऊ” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.