Viral Video: आजकाल सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतात, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. आताही असाच एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात पती-पत्नी नाचताना दिसतायत.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एका हळदीतील सुंदर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक पत्नी आपल्या पतीबरोबर डान्स करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये एक महिला स्टेजवर नाचायला सुरुवात करते; पुढे तिचा पतीदेखील स्टेजवर येऊन तिच्याबरोबर नाचतो. यावेळी ते दोघेही ‘डार्लिंग तुम्हारा है जमाना’ या हिंदी गाण्यावर नाचत आहेत. त्यांचा हा डान्स पाहून स्टेजच्या आसपास उभे असलेले सर्व जण टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. त्यांचा हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kay_mahnto_bhava या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिलंय की, “नवरा खूप खूश आहे.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “दोन पैसे कमी कमावले तरी चालेल, पण माणूस बायकोसोबत असा खूश पाहिजे”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “कशाला लागते पैशाची श्रीमंती”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “ना कुठला मोठा स्टेज… ना भरमसाठ मेकअप…. एकदम साधं सिंपलमध्ये चेहऱ्यावरचे फक्त हावभाव देऊन एक मराठमोळी जोडपं आपलं प्रेम व्यक्त करत आहे.”