Husband Saves Wife Rangoli With Sweetest Way : सणासुदीला घराबाहेर रांगोळी काढणे एक मोठा टास्क असतो, असे म्हणायला हरकत नाही. सगळ्यात आधी रांगोळी कोणती काढायची हा प्रश्न; मग डिझाईन ठरली की, आधी गेरूने सारवून घेऊन ती जागा सुकेपर्यंत वाट बघायची. त्यानंतर रांगोळी काढायला सुरुवात करायची आणि मग त्यात रंग भरायचे. एवढं सगळं केल्यानंतर सध्याची परिस्थिती बघता, पाऊस पडला की, या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. पण, आज सोशल मीडियावर एका नवऱ्याने आपल्या पत्नीची मेहनत वाया जाऊ न देण्यासाठी एक जबरदस्त उपाय शोधून काढला आहे.

दिवाळीदरम्यान शूट करण्यात आलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका महिलेने दिवाळीदरम्यान दारात प्रभू श्रीराम आणि माता सीता यांची सुंदर रांगोळी काढली आहे. रांगोळी पाहून ती काढण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागली असणार, असा अंदाज तुम्हालाही नक्कीच येईल. पण, दिवाळीत अनेक ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. त्यामुळे ज्या महिलेने ती रांगोळी मेहनत घेऊन काढली, त्या रांगोळीचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी नवऱ्याने खिळे, दोरी आणि बाईकच्या मदतीने रांगोळीवर प्लास्टिकचे आच्छादन उभारले आहे.

कौशल्याचं कौतुक करणारा नवरा (Viral Video)

नवऱ्यानं बायकोचे विचार, निर्णय, तिच्या आवडी-निवडींना मान दिला पाहिजे. कधी कधी बायकोच्या लहान-मोठ्या यशाचे कौतुक करणे किंवा त्याच्या प्रयत्नांना मान देणे हे शब्दांतून नाही, तर कृतीतूनही व्यक्त करता आले पाहिजे. तुम्ही व्हिडीओत पाहिले असेल की, बायकोने मेहनतीने काढलेली रांगोळी खराब होऊ नये म्हणून किंवा पावसामुळे पुसून जाऊ नये म्हणून नवऱ्याने लगेच त्यावर प्लास्टिक बांधून टाकले. ते पाहून बायको खूश झाली आणि तिने या गोष्टीचा व्हिडीओ शूट करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @shraddhuu1007 आणि @shubh_24.04 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जेव्हा तुमचा नवरा तुमच्या मेहनतीची प्रशंसा अशा प्रकारे करतो,’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून “लकी बायको”, “एवढ्या छान काढलेल्या रांगोळीचे संरक्षण तर केलंच पाहिजे”, “कौशल्याचं कौतुक करणारा नवरा” आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.