VIRAL VIDEO: किम कार्दशियनची फॅशन नेहमीच चर्चेत असते. तिचा हटके अंदाज तिच्या एका साध्या इव्हेंटला पण फॅशन गालामध्ये बदलू शकतं. यावेळेस तिचा मिलान फॅशन वीकमधील ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चमचमता हिरेजडित घट्ट बॉडीकॉन ड्रेस परिधान करून किम या कार्यक्रमाला पोहचली, नेहमीप्रमाणेच सर्वांच्या आकर्षणाचा मुद्दा ठरली, शेकडो कॅमेरांसमोर आपली जादू दाखवली पण या सगळ्यापेक्षा तिचा एका कॅमेरा मागचा व्हिडिओच जास्त व्हायरल होत आहे. किमचा ड्रेस नेहमीप्रमाणेच इतका घट्ट होता की तिला चालताना, पायऱ्या चढताना अपार कष्ट करावे लागत होते. तुम्ही या व्हिडिओमध्ये तिच्या ड्रेसचे बारकावेही पाहू शकता.
किम कार्दशियनने स्वतः हा BTS व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिचं पायऱ्या चढतानाचं, चालतानाचं स्ट्रगल दिसत आहे. किमचा ड्रेसचा नाही तर तिने घातलेल्या डोल्से गब्बाना हिल्ससुद्धा खूपच उंच टाचांच्या आहेत. ड्रेस घट्ट असल्यामुळे, किम पायऱ्या चढण्यासाठी उडी मारताना दिसत आहे. यानंतर जेव्हा तिने कारमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर तिची जी अवस्था झाली ती बघून नेटकऱ्यांनी चांगलीच मजा घेतली आहे.
Viral Trends: वजन कमी करा, १० लाख बक्षीस मिळवा; ‘या’ कंपनीच्या CEO ने दिली भन्नाट ऑफर
नेटिझन्स या व्हिडिओवर मीम्स आणि जोक्ससह प्रतिक्रिया देत आहेत. “किम या घट्ट ड्रेस मध्ये फिरण्याचा जसा प्रयत्न करत आहे, मला जीवनात तसा दृढनिश्चय हवा आहे,” असे काहींनी म्हंटले आहे. तर हे पाहता आपले ढगळे कपडे किती भारी आहेत हे ही नेटकरी सांगताना दिसत आहेत.
किम कार्यदेशीयनचा व्हायरल व्हिडीओ
किमला आहे ‘हा’ मोठा आजार..
किमने अलीकडेच वेगन डाएटच्या आधारे सोरायसिसशी लढा देण्याबाबत सांगितले होते. किम सध्या ४१ वर्षांची आहे आणि वयाच्या 15 व्या वर्षांपासून ती सोयरासिसला लढा देत नाही. अनेकदा यामुळे त्वचेवर लाल डाग दिसतात ज्यामुळे ती चिडताना दिसून आली आहे. या आजारात त्वचेला हलके पडतील असे कपडे घालण्याचा सल्ला दिला जातो मात्र किमची फॅशन नेहमीच चमचमत्या घट्ट कपड्यांभोवती फिरताना दिसते.
दरम्यान, किमने तिची बहीण ख्लोई हिच्यासोबत मिलानमधील फॅशन वीकमध्ये हजेरी लावली. ख्लोई आता ‘365 डेज’ अभिनेता मिशेल मोरोनसोबत डेट करत असल्याच्या चर्चा आहेत, याच फॅशन वीकमध्ये ख्लोई आणि मिशेल यांनी एक पोझ देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते.