Viral Video: सोशल मीडियावरील जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. जंगलातील प्राण्यांबाबतीतल्या अनेक गोष्टी पाहण्यासाठी युजर्सही नेहमीच उत्सुक असतात. आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये वाघ, बिबट्या, सिंह किंवा चित्ता या हिंस्र प्राण्यांना नेहमीच इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिले असेल. प्राण्यांची शिकार करण्यासाठी या हिंस्र प्राण्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात. अगदी आपली शिकार शोधण्यापासून ते ती शिकार मिळवण्यापर्यंत हे हिंस्र प्राणी खूप मेहनत घेतात. आता एका बिबट्याचा असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय ज्यात हरणाच्या कळपामागे जीवतोडून धावताना दिसतोय.

हिंस्र प्राण्यांसाठी ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो, त्यालाही आपला जीव वाचावा, असं वाटतं. त्यामुळे तोदेखील जीवाच्या आकांतानं शिकार होण्यापासून वाचण्यासाठी पळत असतो. अनेकदा त्यांची ही धाव यशस्वी होते, तर अनेकदा त्यांना आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान, आता असाच एक थरारक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हरणांचा भला मोठा कळप पाहून बिबट्याच्या पोटातली आग जागी होते. बिबट्या आपल्यावर हल्ला करेल या भीतीने संपूर्ण कळप जंगलात वाट सापडेल त्या दिशेने पळत सुटतो. बिबट्यादेखील हरणांच्या मागे धावताना दिसतोय. परंतु पुढे बिबट्याच्या तावडीत हरण सापडते की नाही हे दृश्य या व्हिडीओत कैद झालेले नाही.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @savannaprivategamereserve या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.