Viral Video Leopard Enters Udaipur Home : जंगलातील प्राणी मानवी वस्तीत दिसण्याच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. वाघ, सिंह, बिबट्या अनेकदा माणसांवर हल्ला करतात, ते रात्री परिसरात फेरफटका मारतात किंवा ते थेट घरात शिरूनही हल्ले करू लागले आहेत. जंगली प्राण्यांचा सामना करणे वाटते तितके सोपे नसते. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क होऊन जाल…

बिबट्याला पाहून स्वतःचा जीव वाचवणारे, नाव ऐकून पळ काढणाऱ्या जगात आज एका महिलेच्या धाडसाने सगळ्यांना थक्क करून सोडले आहे. तर घडले असे की, उदयपूरमध्ये एका महिलेच्या घरात अचानक एक बिबट्या घुसला. पण, ती महिला घाबरून गेली नाही; उलट तिने बिबट्यालाच पकडण्याचे अचाट धाडस दाखवले. एवढेच नाही, तर तिने त्याला घराबाहेर दोरीने बांधून ठेवले आणि वन विभागालाही कळवले.

भारतीय पत्नीचा नाद करायचा नाही (Viral Video)

व्हिडीओ कधी आणि कुठे काढला आहे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण, आज महिलेने चक्क बिबट्याला पकडून ठेवले आहे. एकंदरीत एरव्ही शांत दिसणारी एखादी सामान्य स्त्रीही वेळ आल्यावर तिचे रौद्र रूप दाखवून, सगळ्यांनाच थक्क करू शकते. त्याचं उत्तम उदाहरण व्हिडीओत दिसते आहे. बिबट्या घराच्याहेर पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. पण, व्हिडीओतील महिलेनं बिबट्याचा एक पाय अशा प्रकारे बांधून ठेवला होता की, बिबट्याला स्वतःची सुटका करणे शक्यच नव्हते. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा बघाच…

व्हिडीओ नक्की बघा….

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @sarcasmicguy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘उदयपूरमध्ये अचानक एका घरात बिबट्या घुसला. पत्नीने त्याला दोरीने बांधले आणि वन विभागाला कळवले’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून काही नेटकरी मजेशीर, तर काही महिलेच्या धाडसाचे कौतुक करताना दिसत आहेत. “छान काम! मला खात्री आहे की, बाहेरच्या लोकांनी या बिचाऱ्या प्राण्याला मारून सेल्फी काढला असता”, “तिने दोरीने त्याचा पाय बांधलाच कसा”, “भारतीय पत्नीचा नाद करायचा नाही” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.