Viral Video: या जगातील काही मनुष्य स्वभावाने प्रेमळ, दयाळू, निस्वार्थी असतात तर काही मनुष्य रागीट, लोभी किंवा भांडखोर असतात. ज्याप्रमाणे मनुष्यांचे विविध स्वभाव असतात त्याचप्रमाणे प्राण्यांचेही विविध स्वभाव असतात. जंगालातील हिंस्र वृत्तीच्या प्राण्यांमध्ये वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या काही प्राण्यांचे नाव घेतले जाते. या प्राण्यांच्या हिंसक वृत्तीमुळे जंगलातील इतर प्राणी असो किंवा मनुष्य असो सर्वचजण त्यांना घाबरतात. या प्राण्यांच्या याच स्वभावामुळे त्यांच्या संकटकाळात कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांची मदत करत नाही. आता असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात एक बिबट्या मदतीसाठी धडपडताना दिसत आहे.

समाजमाध्यमांवर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्यूज मिळवतात. परंतु यातील काही व्हिडीओ असे असतात जे आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असतात. अनेकदा जंगलातील काही हिंस्र प्राणी शिकारीच्या शोधात मानवी वस्तीमध्येही शिरकाव करतात. या व्हिडीओतील बिबट्याही मानवी वस्तीत शिरकाव करतो. पण, यावेळी त्याच्याबरोबर असं काही घडतं जे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रस्त्यावर गड्यांची वर्दळ सुरू असून यावेळी एक बिबट्या एका कारच्या पुढच्या ग्रिलमध्ये अडकतो. गाडीच्या ग्रिलमध्ये त्याचे शेपूट अडकते ते काढण्यासाठी तो अनेक प्रयत्न करताना दिसतो. पण काही केल्या त्याची त्यातून सुटका होत नाही. यावेळी त्या कारचा मालकही भितीमुळे गाडी बाहेर येऊन त्याची मदत करत नाही. शिवाय रस्त्यावरील इतर लोकही बिबट्याच्या मदतीसाठी धावून येत नाहीत.

हेही वाचा: “एखाद्याच्या संयमाचा अंत पाहू नका”, तरस प्राण्यानं डिवचलं म्हणून सिंह चवताळला, पुढे असं काही घडलं… VIDEO पाहून उडेल थरकाप

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by wildanimalearth98 (@wildanimalearth98)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @wildanimalearth98 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास ३२ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “तो हल्ला करेल म्हणून कोणीही त्याची मदत करणार नाही”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “बिचाऱ्याच्या मदतीला कोणीही आलं नाही”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “थरारक व्हिडीओ”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “खूपच वाईट घटना.”