Elephant Breakfast Making Video : कॅम्पमध्ये हत्तींना दुसरं जीवन जगण्याची संधी मिळत असते. सर्कस, प्राण्यांची गर्दी तर प्राणिसंग्रहालयातून बचाव केलेले तर रस्त्यावरच्या अपघातांतून वाचवलेले असे जगभरातले हत्ती इथे असतात. आतापर्यंतच्या आयुष्यात त्यांनी संघर्ष केलेला असतो म्हणून आराम मिळावा म्हणून त्यांची आनंदाने काळजी घेतली जाते . तर यादरम्यान भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी सुप्रिया साहू यांनी हत्तींना अशा कॅम्पयामध्ये निरोगी राहण्यासाठी काय खाऊ घालते जाते याबद्दल माहिती दिली आहे.
तामिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र अभयारण्यात असलेल्या थेप्पाकडू हत्ती कॅम्पमध्ये हत्तींना खाऊ घातल्या जाणारा नाश्ता कशाप्रकारे बनवला जातो याची झलक दाखवण्यात आली आहे. नाचणी, तांदूळ, हरभरा, कुळीथ, नारळ आणि गूळ वापरून या पदार्थांना मिक्स करून एक भलामोठा गोळा तयार केला जातो आहे. त्यानंतर हा अन्नाचा गोळा माहुत हत्तीजवळ जातात आणि सकाळचा नाश्ता आपल्या लाडक्या हत्तींना भरवतात आणि हत्ती देखील आनंदाने नाश्ताचे सेवन करताना दिसत आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी सुप्रिया साहू यांनी मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील तमिळनाडूमधील थेप्पाकडू हत्ती कॅम्पला भेट दिली होती. यादरम्यान हत्तीचे नाश्ता करतानाचे दृश्य पाहून त्यांना आनंद झाला. मग त्यांनी या क्षणाचा खास व्हिडीओ घेऊन “थेप्पाकडू हत्ती कॅम्पमध्ये जेव्हा नाचणी , कुळीथ आणि भात शिजवण्याचा सुगंध हवेत दरवळतो आणि माहुत नारळ आणि गूळ त्यात मिक्स करून, स्वतःच्या हाताने तयार केलेला नाश्ता हत्तींपर्यंत पोहोचवतात आणि हत्ती तो खातात, तेव्हा दृश्य खूप छान आणि मजेशीर असते” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @supriyasahuias या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये व्हिडीओ संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा “हे खरंच अद्भुत आणि सुंदर दृश्य आहे. हत्तींना पोषक आहार दिला जातो, त्यांचा आदर केला जातो. हा आदर आणि त्यांची काळजी घेणाऱ्या महावतांना खूप शुभेच्छा”, ” मी पहिल्यांदांच हत्तीसाठी कसा आणि काय नाश्ता बनवला जातो हे पहिले आहे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.
