तुमच्यापैकी किती जणांनी कधी विचार केला असेल की आपण आरामात झोपून ऑफिसला जावे. आरामात बेडवर झोपून दूर कुठेतरी फिरायला जावे. आपल्या पंलग किंवा बेडवर झोपून राहायला कोणाला नाही आवडत. तुम्ही कल्पना करा की, प्रवास करतानाही तुम्हाला कधीही तुमचा पलंग सोडावा लागणार नाही तर… कदाचित या स्वप्नाने प्रेरित होऊन, एका व्यक्तीने त्याच्या पलंगाचे कारमध्ये रूपांतर केले. तो त्याचा ‘जुगाड पलंग कार’ घेऊन रस्त्यावर उतरला आहे. आता या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका माणसाने अशक्य वाटणारी ही कल्पना प्रत्यक्षात खरी केली आहे. या व्यक्तीने त्याचा पलंगाचे पूर्णपणे कार्यक्षम वाहनात रूपांतर केले आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणले आहे. या विचित्र पण मजेदार निर्मितीचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे, ज्याला जवळजवळ ६० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर noyabsk53 नावाच्या वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, पश्चिम बंगालमधील एक माणूस गर्दीच्या रस्त्यावरून सहजपणे त्याच्या बेडमध्ये बसून गाडी चालवताना दिसतो. हे दृश्य पाहून दुचाकीस्वारांना खूप मजा येते. हा फक्त एखादा बेड नाही. तो पूर्णपणे गादी, बेडशीट आणि उशांनी सुसज्ज असलेला बेड आहे, परंतु एक विचित्र ट्विस्ट आहे. बेडच्या पायांजवळ साइड मिरर जोडलेले आहेत. ड्रायव्हर बेडच्या स्टोरेज चेस्टमध्ये बसतो, स्टीअरिंग व्हील पकडतो जो खाली असलेल्या चाकांना नियंत्रित करतो, जे व्हिडिओमध्ये दिसत नाहीत.

एका क्षणी, तो उभा राहतो आणि शाहरुख खानच्या आयकॉनिक पोझ देत सर्वांचे लक्ष वेधून घेतो आणि नंतर परत बसतो आणि सहज गाडी चालवतो.

व्हिडिओ पहा:

अर्थातच, इंटरनेटवर या हटके राईडबद्दल बरीच चर्चा होत आहे. कोणी या गाडीचे कौतुक केले तर कोणी खिल्ली उडवली.

स्कूपहूपने विनोद केला, “बीएलआर ट्रॅफिकमध्ये झोप घेण्यासाठी हे आवश्यक आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “हे फक्त भारतातच पाहता येते.” तिसऱ्याने म्हटले, असे दिसते की,”आपण ३४९ रुपयांचे रिचार्ज करून पाहतो.”

चौथ्याने म्हटले की, “मोशन सिकनेस असलेल्या लोकांसाठी उत्तम.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी एकाने म्हटले “भावाने माझे बालपणीचे स्वप्न पूर्ण केले आहे.” दुसऱ्या यूजरने लिहिले की, “चांगला अविष्कार आहे. आता बेडवर झोपून करा लॉन्ग ड्राईव्ह .”