Viral Video Man Installs Personal Security Devices On His Helmet : घरी असो किंवा बाहेर सध्याच्या काळात माणसांनाच माणसांपासून धोका आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने घरात आणि घराबाहेर आपण सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतो. चोरी, घरफोडी, छेडछाड, अनोळखी व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, सुरक्षा, निरीक्षण, पुरावे गोळा करणे यांसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर करू शकतो. असे असले तरी आपण सुरक्षेसाठी हा सीसीटीव्ही कॅमेरा घेऊन फिरू शकत नाही; पण आज एका व्यक्तीने चक्क हे करून दाखवले आहे.

व्हायरल व्हिडीओ इंदूरमधील आहे. इंदूरमधील एका व्यक्तीने गाडी चालवताना त्याच्या हेल्मेटवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. सतीश चौहान असे या व्यक्तीचे नाव आहे. सतीश इंदूरच्या हिरानगर पोलिस ठाणे परिसरातील गौरी नगरचा रहिवासी आहे. सतीशच्या कुटुंबाला त्यांच्या शेजाऱ्यांकडून धोका आहे. त्यामुळे त्याने स्वतःच्या सुरक्षिततेकरिता आपल्या बाबतीत कोणाकडूनही गैरवर्तन होऊ नये आणि झाल्यास त्याचे पुरावे गोळा करता यावेत यासाठी हा कॅमेरा बसवला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सतीश चौहान त्याची दुःखद परिस्थिती सांगतो आणि ‘मला पाठिंबा द्या’, असे आवाहनसुद्धा करतो आहे.

स्वतःची मदत स्वतःच करण्याचा निर्णय (Viral Video)

सतीशने व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचे शेजारी बळीराम चौहान आणि मुन्ना चौहान यांच्याशी त्याचा बऱ्याच काळापासून मालमत्तेचा वाद सुरू आहे. सतीशचा आरोप आहे की, बळीराम आणि मुन्ना त्याची मालमत्ता (जागा) हडप करू इच्छितात आणि या वादामुळे दररोज त्यांच्यात मारामारी होत राहते. सतीशच्या मते, परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, त्याला आपल्या जीवाची भीती वाटते. सतीश म्हणाला की, त्याचे शेजारी त्याच्या घरात घुसतात, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करतात. त्याच्या घरात लावलेला कॅमेरा शेजाऱ्यांनी काढून टाकला आहे. म्हणून त्याने हा भन्नाट उपाय केला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सतीशचा दावा आहे की, पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाला कोणतीही सुरक्षा पुरवलेली नाही. सतीश आणि त्यांच्या कुटुंबाने पोलिसांशी संपर्क साधून, तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करूनही त्यांना मदत नाकारली आहे. सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर सतीशने शेवटी स्वतःच स्वतःची मदत करण्याचा निर्णय घेतला. काही गैरवर्तन झाल्यास त्याचा पुरावा मिळावा म्हणून त्याने त्याच्या हेल्मेटवरच सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. भविष्यात कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी पुरावे गोळा करता यावेत आणि स्वतःची सुरक्षाही व्हावी यासाठी त्याने हे मजेशीर अन् भन्नाट असे टोकाचे पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Anurag_Dwary या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘पहिल्या नजरेत हे दृश्य तुम्हाला हसवेल. पण इंदूरमध्ये एका व्यक्तीला हेल्मेटला सीसीटीव्ही कॅमेरा लावून फिरण्यास भाग पडले आहे’, अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे.