Viral Video Man Lifts Scooter Over Head : भारतात अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे शहरांमधील लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे. विशेषतः राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राम शहरात पावसाने कहर केला. येथे पाणी तुंबल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. गुरुग्राम शहरात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी तुंबले आणि ७ किलोमीटरपेक्षा जास्त वाहतूक कोंडी झाली. हे पाहून ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका तरुणाने काय केलं पाहाच…
व्हायरल व्हिडीओतील घटना सोमवारी घडली आहे. अनेक प्रवासी ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. ट्रॅफिकमधून कधी बाहेर पडणार याची चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते आहे. पण, किती वेळ असंच बसून राहणार म्हणून एका तरुणाने जुगाड केला आहे. वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात, एका माणसाच्या मदतीने तरुण स्कूटर खांद्यावर उचलून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला.
तो सगळ्यांच्या आधी घरी पोहचला असेल (Viral Video)
अनेकदा दुचाकी आपल्याला ट्रॅफिकमधून वाट काढून घरी लवकर पोहचण्यास मदत करते, कुठेही पोहचायला उशीर झाला असेल तर वेळेत पोहचण्यास मदत करते. त्यामुळे चारचाकी पेक्षा अनेक जण दुचाकी घेऊन फिरण्याला जास्त प्राधान्य देतात. इथेही अशीच परिस्थिती उद्भवल्यामुळे तरुणाने चक्क दुचाकी खांद्यावर घेऊनच ट्रॅफिकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gurgaon_locals आणि @gurgaonmericity या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “रोज स्कुटी मला घेऊन जाते; आज मी स्कुटीला घेऊन जाणार” , “बाईक उचलण्याचे ५०० रुपये; हा नवा व्यवसाय सुरु झाला आहे वाटतं”, “तो सगळ्यांच्या आधी घरी पोहचला असेल”, “ईव्ही होती म्हणून आरामात उचलून घेऊन गेलास” ; आदी अनेक मजेशीर कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत