Viral Video: आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो, त्या व्यक्तीशीच आपलं लग्न व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे हल्ली प्रेमविवाह करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. पूर्वीच्या काळी आई-वडील सांगतील त्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर अनेकांना मनाविरुद्ध लग्न करावं लागायचं. परंतु, आता अनेक जण आपला जोडीदार स्वतःचं निवडतात. लग्नाचे अनेक सुंदर व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. परंतु, आता असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

नातं कुठलंही असो, कोणत्याच नात्याची सुरुवात समोरच्यावर बळजबरी करून होत नाही. शिवाय त्यात जर पती-पत्नीच्या नात्याबद्दल बोलायचं झालं तर ते नातं इतर नात्यांपेक्षा खूप वेगळं असतं, त्यामुळे या नात्यामध्ये दोघांची सहमती असणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर अशा नात्यात कोणीही कधीच सुखी राहू शकत नाही. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका ठिकाणी एका अल्पवयीन मुलीच्या दोन्ही बाजूला पुरुष बसले असून यावेळी त्यातील एक जण त्या मुलीच्या मनाविरुद्ध तिच्या भांगेत कुंकू भरतो, तर दुसरा ती विरोध करू नये म्हणून तिला पकडून ठेवतो. त्यानंतर भांगेत कुंकू भरणारी व्यक्ती त्या मुलीला घट्ट मिठी मारते. यावेळी ती मुलगी रडताना दिसतेय. यावरूनच त्या मुलीच्या मनाविरुद्ध ती व्यक्ती लग्न करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळलं नसलं तरी सध्या सोशल मीडियावर हा प्रचंड व्हायरल होत आहे.\

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @prematil_athavana या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “किती नालायक आहे हा”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “या नालायकाला फाशी द्या सगळ्यांनी मिळून, ती मुलगी किती लहान आहे, त्याच्या मेंदूत किडे झालेत वाटतं”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “मूर्खांचा बाजार आहे हा.”