Viral Video: ट्रेनमधून दररोज असंख्य लोक प्रवास करत असतात. यादरम्यान, नेहमीच काही ना काही वेगळं पाहायला मिळतं. ट्रेनमध्ये अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्या पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ट्रेनमध्ये चोरी, ट्रेनला लटकून केलेले स्टंट असे अनेक ट्रेनसंदर्भातले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अशा माणसांचं करायचं तरी काय हा प्रश्न पडतो.

पण सध्या याहून भयंकर आणि विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एका माणसाने हद्दच पार केली आहे. या माणसाने ट्रेनमध्ये सगळ्यांसमोर जे केलं ते पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात माराल. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…

ट्रेनमध्ये अक्षरश: मर्यादाच ओलांडली (Man pees from Train Window)

ट्रेनमध्ये अनेक विचित्र घटना घडताना आपण पाहिल्या असतील. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही घटना पाहून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक माणूस चक्क ट्रेनच्या खिडकीतून लघवी करताना दिसतोय. धावत्या ट्रेनमध्ये या माणसाला हा किळसवाणा प्रकार सुरू आहे. कसलीही लाज न बाळगता सगळ्यांसमोर थेट ट्रेनच्या खिडकीतून माणूस लघवी करताना दिसतोय. यादरम्यान, ही घटना दिल्ली आणि शामली दरम्यान ट्रेनमध्ये घडली असल्याचं बोललं जातंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @anuj_bansa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २. ८ मिलियन व्ह्युज आले आहेत. तसंच “रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या मद्यपींच्या नियंत्रणाखाली आहेत, दररोज नवीन दुःखद घटना घडत आहेत. @upgrp_hq ला मद्यपींच्या नियंत्रणातून गाड्या मुक्त कराव्या लागतील, सुरक्षा सतर्क आणि कडक करावी लागेल. नाही ही घटना ट्रेन क्रमांक ६४०९२ ची आहे आणि ती दिल्ली आणि शामली दरम्यान असल्याचे सांगितले जाते आणि @sp_grpmoradabad ला ट्रेनमध्ये अशा घटनांवर कडक बंदी घालावी लागेल.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “म्हणूनच शिक्षण महत्त्वाचं आहे” तर दुसऱ्याने “लोकांना झालंय काय” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “त्याचा चेहरापण दाखवायला हवा होता”