Viral Video: स्वतःच्या लग्नाचा दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी खूप खास असतो. आयुष्यात एकदाच साधला जाणारा हा विस्मरणीय क्षण असतो. त्यामुळे वधू-वर आपला हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा याची पूरेपूर काळजी घेतात. मग त्यात अगदी डान्स, सुंदर लूक, हटके उखाणे यांची तयारीही आधीपासूनच करून ठेवतात. सोशल मीडियावर अनेकदा नवरीच्या गमतीशीर उखाण्यांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. पण, आता एका नवऱ्याचा उखाणा खूप व्हायरल होतोय, जो ऐकून तुम्हीही कौतुक कराल.
लग्न म्हणजे फक्त वधू-वरच नव्हे, तर दोन कुटुंबांच्या दोन वेगवेगळ्या परंपरादेखील एकमेकांशी जोडल्या जातात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. या व्हिडीओतील वधू मराठी असून, वर मारवाडी आहे. त्यामुळे या लग्नामध्ये दोघांकडील प्रथा, परंपरा आणि भाषा यांचा सुंदर मेळ जमल्याचे पाहायला मिळत आहे.
हा व्हायरल व्हिडीओमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्यावेळी वर म्हणतो की, माझी मराठी ऐकून कदाचित येथील लोक पळून जातील. त्यावर समोर उभे असलेले सर्व जण मोठमोठ्याने हसतात. त्यानंतर वर म्हणतो… सिद्धी तू माझी बायको आणि मी तुझा नवरा… “अब थाली में पुरणपोली और दाल बाटी… सिद्धी मेरी जीवनसाथी” त्याचा हा उखाणा ऐकून सर्व जण टाळ्या आणि शिट्या वाजवतात. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @clickography या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि त्यावर आतापर्यंत चार दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि तीन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
एकानं लिहिलंय, “खूप छान जोडी आहे तुमची”. तर दुसऱ्यानं लिहिलंय, “मस्त दोघेही खूप छान”. तिसऱ्यानं लिहिलंय, “दोघांच्या आयुष्यातील सुंदर क्षण”.