Inspiring Mother Viral Video : नोकरीसाठी घराबाहेर पडणार्‍या स्त्रियांची संख्या वाढत चालली आहे. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी, कुटुंबाची आर्थिक गरज आणि शिक्षणातून आलेलं पुढे काही तरी करून करण्याचे थोडस स्त्रियांना आज वेगेवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर घेऊन जात आहेत. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये स्त्री नोकरी आणि घरखर्च करण्यासाठी काय करू शकते याचे उत्तम उदाहरण व्हिडीओत पाहायला मिळणार आहे.

प्रत्येक स्त्री मुलगी, बायको आणि सुनेबरोबर आई होण्याचाही तिची भूमिका अगदी चोख निभावत असते. तर व्हायरल व्हिडीओत महिला रिक्षा चालवताना दिसते आहे. घरखर्च करण्यासाठी आणि नवऱ्याला हातभार लावण्यासाठी तिने रिक्षा चालवण्याचे ठरवले आहे. तसेच ती रिक्षा चालवताना तिच्या जबाबदारीला म्हणजे लेकीलाही बरोबर घेऊन आली आहे. सकाळी ६ वाजता तिची लेक साखर झोपेत असल्यामुळे तिने प्रवासी बसतात तिथे असणाऱ्या डिक्कीत लेकीला अगदी सुरक्षितपणे झोपवले आहे आणि तिचे रिक्षा चालवण्याचे काम करताना दिसते आहे.

मुजरा फक्त ताई तुला (Viral Video)

नोकरी करणाऱ्या महिलांना अनेकदा त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. आई किंवा सुनेकडे आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी हट्ट करावा लागतो. यादरम्यान कुठेतरी तिला स्वतःच्या मुलापासून लांब रहावे लागते. यादरम्यान ती कोणाकडेही तक्रार सुद्धा करू शकत नाही आणि दुसरीकडे नोकरी सुद्धा सोडू शकत नाही; त्यामुळे व्हायरल व्हिडीओतील महिलेने आपल्या लेकीला रिक्षा चालवताना स्वतःबरोबर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @jahnavikillekar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेदारने “सॅल्यूट ताई. हे एक स्त्रीच करू शकते” अशी कमेंट्स तर अनेक युजर्स “तुझ्या कष्टाचा मोल नक्की नक्कीच देव तुला लवकर देईल”, “ताई तुम्ही काळजी घ्या सगळ लवकर चांगलं होईल प्लिज”, “मुजरा फक्त ताई तुला”, “स्टीलची ग्रील बनवा छोटीशी.. असं झोपेत मोकळं ठेऊ नका”, “ताई मागे काहीतरी सपोर्ट लावून घ्या प्लिज लेकरू गाडी चालू असताना झोपेत पडू शकते”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दसून आले आहेत.