Viral Video Monkeys Play on Railway Station Water Tank : प्रवासातून जाताना किंवा अगदी शाळा, ऑफिसला निघताना सुद्धा आपल्याबरोबर पाण्याची बाटली ठेवावी अशी घरची मंडळी आपल्याला सतत सांगत असतात. पण, बाहेर सगळीकडे पाण्याच्या बाटल्या उपलब्ध असल्यामुळे आपण सहसा पाण्याची बरोबर ठेवत नाही. आपल्यापैकी बरेच जण रेल्वे स्टेशनवर उपलब्ध असलेल्या नळाद्वारे चेहरा धुतात, बॉटलमध्ये पाणी भरून घेतात. काही जण तेथील सार्वजनिक सौचालयांचा वापर करतात. पण, हे सगळं पाणी पाण्याच्या टाकीत नेमके कुठून येते? ती टाकी नेमकी स्वच्छ असते का याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही… तर मग ही बातमी अगदी शेवटपर्यंत वाचा…

एका रेल्वे स्टेशनच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत अत्यंत अस्वच्छ आणि चिंताजनक दृश्य पाहायला मिळाले आहे. व्हिडीओमध्ये स्टेशनच्यावर बसवलेल्या दोन पाण्यांच्या टाक्या झाकण न लावता अशाच उघड्या ठेवलेल्या दिसत आहेत. फक्त एवढंच नाही तर या टाकीत एक माकड अंघोळ करताना दिसत आहे. इतर दोन माकड शेजारी असणाऱ्या टाकीवर बसलेले दिसत आहेत. पाण्याच्या टाक्या देखरेखीशिवाय किंवा साफसफाईशिवाय अशा का उघड्या ठेवल्या आहेत हा प्रश्न अनेकांना पडलेला दिसतो आहे.

एकही सरकारी विभाग यासाठी काम करत नाही… (Viral Video)

रेल्वे स्टेशनवर बसवलेल्या या पाण्याच्या टाकीचा उपयोग खाद्यपदार्थ बनवण्यासाठी दुकानदार, स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी किंवा अगदी प्रवासी सुद्धा तहान भागवण्यासाठी करत असणार. पण, हे पाणी जर व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे आपल्यापर्यंत पोहचत असेल तर खरोखरच आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो आणि आपल्या सगळ्यांसाठीच चिंतेची बाब ठरू शकते. माकडे कुठेकुठे फिरून येतात आणि मग ती अशा पाण्याच्या टाक्यांमध्ये जाऊन बसतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @talk2anuradha या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये “रेल्वे स्टेशनवरील पाण्याच्या टाक्यांमध्ये माकडे अक्षरशः मस्ती करताना दिसत आहेत. एखाद्या खाजगी इमारतीत असे घृणास्पद काही घडू शकते यावर विश्वास बसत नाही. प्राणघातक आजार पसरण्याची कल्पना करा. एकही सरकारी विभाग यासाठी काम करत नाही. ते फक्त पगार, लाच आणि पेन्शन गोळा करतात” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.