सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एक तरुण मुलगा खांद्यावर बॅग लटकवून रस्त्यावरून पळताना दिसतोय. पळता पळता मागून एक कारवाला येतोय आणि त्याच्याशी गप्पा मारतोय, त्याला घरी सोडण्याची इच्छा दर्शवतोय. तुमच्या पर्यंतही हा व्हिडीओ आला असेलच. हा व्हिडीओ प्रदीप मेहरा या मुलाचा होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रदीपने सगळ्यां एक संदेश दिला आहे.

त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रदीपने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “हे सगळं अचानक घडलं… माझा अजूनही विश्वास बसत नाही. माझा व्हिडिओ व्हायरल होईल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. लोक फोटो आणि रील्ससाठी माझा पाठलाग करत आहेत! माझे संपूर्ण जग एका रात्रीत बदलले. लोक माझ्याकडे येत आहेत आणि सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त करत आहेत! मला लाज वाटते.”

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असूनही घरजावई? विकी जैनने सांगितलं अंकिता लोखंडेच्या घरी राहण्याचे कारण

आणखी वाचा : महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरच्या लेकीची चित्रपटसृष्टीत डॅशिंग एण्ट्री, डान्समध्ये वडिलांनाच दिली टक्कर

पुढे प्रदीपला प्रश्न विचारण्यात आला की “तुला मिळणारी प्रसिद्धी तो कशी हाताळत आहेस?” तेव्हा प्रदीप म्हणाला, “प्रसिद्धी कोणाला आवडत नाही. पण जेव्हा तुमच्याकडे मोकळा वेळ असतो तेव्हा पण मी काम करतो, आणि नॉन-स्टॉप कॉल सुरु असतात. त्यामुळे मला कामावर पोहोचायला उशीर होतो आणि त्याची तक्रार केली जाते. बाहेर असताना मी एक सेकंदासाठीही मास्क काढत नाही, कारण मला याची भीती आहे की मला पाहिल्यावर लोक माझा पाठलाग करतील. अशा परिस्थिती लोकांना कसे हाताळायचे हे मला माहित नाही. जेव्हा ते लोक बोलतात की, भाई प्रदीप लगे रहना, तेव्हा बरं वाटतं, पण काय बोलावं तेच कळत नाही, म्हणून मी फक्त होकारार्थी मान डोलावतो. पण या सगळ्यामुळे मी माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करु शकत नाही. तर यापुढे लोकांनी असं करू नका.”

आणखी वाचा : बागेत खेळत असलेल्या चिमुरड्याला गरुडाने उचललं आणि…; बघा Viral Video

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विनोद कापरी यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते प्रदीपला लिफ्ट देण्यासाठी ऑफर करतात. रात्री बारा वाजताच्या सुमारास नोएडा रस्त्यावर प्रदीप त्यांना पाठीवर बॅग घेऊन धावत सुटल्याचं दिसतं. काहीतरी अडचण असेल म्हणून विनोद कापरी त्याला लिफ्ट ऑफर करतात. प्रदीप लिफ्ट नाकारतो म्हणून ते त्याला सारखी विनवणी करतात. पण प्रदीप आपल्या धावत जाण्यावरच ठाम असतो. गाडीत बसायला तो नकारच देत राहतो. प्रदीप रोज दहा किलोमीटर धावत घरी जातो. त्यानंतर घरी जाऊन तो जेवण बनवतो.