सापाचा विषय जरी निघाला तरी अनेकांना धडकी भरते. घनदाट जंगलात, खेडेगावात साप दिसला, तर त्याचे आश्चर्य आपल्याला वाटणार नाही. पण, तुम्ही असेच घरी बसलाय आणि अचानक तुमच्या बाजूला साप दिसला, तर नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. सापाला पाहून तुम्हाला घाम तर फुटेलच; पण त्या ठिकाणाहून तुम्ही लगेच पळ काढाल.

काही साप विषारी असतात, तर काही बिनविषारी. सर्पमित्रांना याबद्दल जास्त माहिती असते. पण, अनेकांना त्याची काहीच माहिती नसल्याने साप पाहताच थरकाप उडतो. जर सापाने दंश केला आणि वेळेत उपचार झाले नाहीत, तर माणसाचा जीवही जाऊ शकतो. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात सापाने दंश केला म्हणून माणसाने चक्क रुग्णालयात त्या सापालादेखील आणले.

हेही वाचा… हा VIDEO पाहून कळेल आयुष्यात वडिलांचं असणं किती गरजेचं, बापाने मरणाच्या दारातून लेकराला आणलं परत, पाहा नेमकं काय घडलं

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक माणूस एका रुग्णालयात चक्क सापाला घेऊन आला आहे. त्याला सापाने दंश केला म्हणून तो चक्क सापालाच घेऊन रुग्णालयात आला. नेमका हा कोणता साप आहे आणि त्याच्या दंशामुळे नेमकी किती प्रमाणात विषबाधा झाली हे जाणून घेण्यासाठी तो सापाच्या मानेला पकडून, त्यालाच रुग्णालयात घेऊन आला. सापाला घेऊन आलेल्या त्या माणसाला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. व्हिडीओमध्ये हा माणूस एका हाताला पट्टी बांधून सापाला घेऊन रुग्णालयात आला आणि अंगात त्राण नसल्यानो तो रुग्णालयातील जमिनीवरच झोपला; पण त्याने सापावरची पकड सोडली नाही.

हा व्हायरल व्हिडीओ @the_humour_logic_mbbs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘दंश केल्यानंतर त्या माणसाने सापाचा प्रकार ओळखण्यासाठी सापाला रुग्णालयात आणले’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओला तब्बल १.४ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले की, त्यानं खरंच चांगलं काम केलं. तर दुसऱ्याने, “खरं तर तो खूप हुशार आहे. हे कदाचित मजेशीर वाटेल; परंतु त्याच्या जगण्याच्या इच्छाशक्तीनं त्यानं सापाचा प्रकार ओळखण्यासाठी त्याला रुग्णालयात आणलं”, असे मत व्यक्त केले आहे.