Couple viral video: सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण याशिवाय अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असता. अलीकडे प्रेमी युगलांचे देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा प्रेमी युगलांचे असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, अक्षरश: असे कृत्य पाहणाऱ्याला लाज वाटत असेल पण जोडप्याला नाही.
प्रेमात असलेल्या जोडप्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवणे किंवा प्रेम व्यक्त करणे यात गैर नसले तरी, सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही मर्यादा पाळणे अपेक्षित असते. मात्र अनेकदा काही जोडपी या मर्यादा ओलांडून इतरांना लाजिरवाणे किंवा अडचणीचे वाटेल, असे वर्तन करताना दिसतात.सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत ज्यात जोडपी सार्वजनिक ठिकाणी, जसे की बाग, रेल्वे स्टेशन किंवा अगदी रस्त्यावरही, अश्लील वाटू शकतील अशा कृत्यांमध्ये गुंतलेली दिसतात. त्यांच्या या वागण्यामुळे आजूबाजूच्या लोकांना, विशेषतः कुटुंबीयांसोबत असलेल्या लोकांना, संकोचल्यासारखे होते.
सध्या असाच धक्कादायक एक प्रेमीयुगलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. यामध्ये धावत्या ट्रेरनमध्ये तरुण-तरुणींचे प्रवाशांसमोर अश्लील चाळे सुरु आहेत. यामुळे हा व्हिडिओ पाहून लोकांनी संतापजनक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अलीकडे प्रेमाच्या आड प्रेमी जोडपे पूर्ण मर्यादाच ओलांडतात. आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत याचेही भान त्यांना नसते. प्रेम दाखवणे वाईट नसते परंतु त्यालाही काही मर्यादा असतात. मात्र, काही प्रेमी जोडपी हद्दच पार करतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील असाच आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पाहू शकता, एक जोडपे ट्रेनमध्ये सीटवर रोमान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी अश्लील चाळे करत अक्षरश: मर्यादाच ओलांडली आहे. आजूबाजूला इतके लोक आहेत, आपल्याला बघत आहेत याचंही त्यांना भान नाहीये. व्हिडीओ सर्वच यावर संताप व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @whagwalovetrep या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर संचापजन अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, “एक जागा सोडत नाहीत.” तर दुसऱ्या एका युजरने अलीकडे असलेच व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे असे म्हटले आहे