गुजरातमधील, बेसन पीठ वापरून बनवला जाणारा मऊ, हलका व चवीला अत्यंत सुंदर लागणारा ढोकळा हा देशभरात जवळपास प्रत्येकाचा आवडता पदार्थ आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. पिवळ्या रंगासह पांढऱ्या रंगाचाही ढोकळा दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेला असतो. आता या दोघांना एकत्र करून म्हणजे पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाच्या ढोकळ्यात चटणी घालून, त्याचे सॅण्डविच किंवा चटणी ढोकळा म्हणून केलेले ‘फ्युजन’ आपल्याला वेगळे नाही. मात्र, सोशल मीडियावर सध्या पिझ्झा आणि ढोकळ्याचे एकत्रीकरण किंवा फ्युजन केल्याचा रेसिपी व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.

पाश्चिमात्य पिझ्झा आणि देशी ढोकळा एकत्र करून खाण्याचा याआधी तुम्ही कधीच विचार केला नसेल. मात्र, @ohcheatday नावाच्या अकाउंटधारी व्यक्तीने त्याबाबत केवळ विचारच केला नाही, तर प्रत्यक्षात तो बनवूनसुद्धा दाखवला आहे. याआधी सोशल पार्लेजी ऑम्लेट, चीज घातलेला संत्र्याचा ज्यूस, वॉफल भेळ आणि नुकतेच बिर्याणी चहाने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. अशातच आता या नवीन पिझ्झा ढोकळ्याची रेसिपी तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ओडिसाच्या ‘सिमिलीपाल काइ’ लाल मुंग्यांच्या चटणीला मिळाला GI टॅग; जगभरात अजून कुठे खाल्या जातात मुंग्या?

या फ्युजन पदार्थासाठी रवा, दही आणि पिझ्झा बेसवर घातले जाणारे पदार्थ टाकून, त्यावर पिझ्झा सॉस टाकला आहे. हे सर्व मिश्रण बेक करण्याऐवजी ढोकळा ज्या पद्धतीने वाफवून वा उकडून घेतो त्या पद्धतीने तयार पिझ्झा-ढोकळ्याचे मिश्रण १० -१५ मिनिटांसाठी वाफवून आणि वरून तेल-लसणाची हलकी फोडणी घालून हा पदार्थ तयार केला गेला आहे.

तसे पाहायला गेल्यास हा पदार्थ इतर पदार्थांसारखा विचित्र नाहीये. परंतु, नेटकऱ्यांनी त्यावर खूपच मिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींच्या मते, एवढा घाट घालण्याची काहीही गरज नाहीये; तर काहींना हा फ्युजन प्रकार आवडला आहे, असे दिसते. नेमके काय म्हणत आहेत नेटकरी ते पाहा.

“याला वेगळं नाव दिलं, तर बरं होईल. कारण- पदार्थाचा आणि दिलेल्या नावाचा काहीही संबंध नाही, असं दिसतं,” असे एकाने लिहिले आहे. “दोन उत्तम पदार्थांना खराब करण्याचा प्रकार आहे हा,” असे दुसऱ्याने म्हटलेय. तिसऱ्याने, “Wow, याची रेसिपी काय आहे? फ्युजन खूप मस्त वाटतंय,” असे काहीसे लिहिले आहे. चौथ्याने, “भारीच आहे हे. मी लवकरच करून पाहीन,” असे सांगितले. शेवटी पाचव्याने, “अरे यार, ढोकळ्याला ढोकळा आणि पिझ्झाला पिझ्झा राहू द्या,” असे लिहिले आहे.

हेही वाचा : गरमागरम चहाला द्या ‘मसालेदार’ बिर्याणी तडका; “याला चहा नका म्हणू, हा…” म्हणत नेटकऱ्यांनी रेसिपीवर दिल्या प्रतिक्रिया…

View this post on Instagram

A post shared by Oh, Cheat Day ! (@ohcheatday)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इन्स्टाग्रामवर @ohcheatday या अकाउंटने शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ३.५ मिलियन व्ह्युज आणि ५५.१ K इतके लाइक्स मिळाले आहेत