Heart touching video : सोशल मीडियावर एक भावूक करणारा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मानवता, दयाळूपणा आणि करुणेचे खरे चित्र दाखवतो. एक साधी विक्रेती तिचे संघर्षमय जीवन आणि त्यातून आलेला दयाळू माणूस या सर्व गोष्टींनी इंटरनेटवरील लाखो लोकांच्या भावनांना उधाण दिले आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, आपण केलेली एक लहान कृती एखाद्याच्या चेहऱ्यावर किती आनंद आणू शकते.

हा व्हिडीओ रस्त्याच्या कडेला केळी विकणाऱ्या एका मध्यमवयीन महिलेचा आहे. ती केळी विकण्याचा प्रयत्न करत तासनतास उन्हात बसते, पण तिच्याकडे एकही ग्राहक येत नाही. शेवटी निराश होऊन त्या महिलेच्या डोळ्यांतून अश्रू येतात आणि ती निराश होऊन बसलेली असते. या मनस्थितीत ती असताना एक तरुण अचानक तिच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन येतो, अगदी क्षणभर तरी.

व्हिडीओमध्ये तो तरुण हसत हसत महिलेकडून सर्व केळी खरेदी करताना दिसत आहे. सुरुवातीला ती महिला आश्चर्यचकित होते आणि त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. परंतु, जेव्हा तो तिला पैसे देतो तेव्हा तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. इतकेच नाही तर तो तरुण तिच्यासोबत बसतो, तिच्या हातचे जेवण करतो आणि तिला थोडे जास्त पैसे देतो, जेणेकरून ती दुसऱ्या दिवशी पुन्हा दुकान लावू शकेल. या सगळ्या दृश्यांनी उपस्थित लोकांच्याच नाही, तर सोशल मीडियावरील सर्व लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे.

पाहा व्हिडिओ

सर्वात भावनिक क्षण तेव्हा येतो, जेव्हा तो युवक सगळी केळी विकत घेतल्यानंतर तीच केळी परत त्या महिलेलाच देतो, जेणेकरून ती महिला ती केळी विकू शकेल.”आज तुझे श्रम वाया जाणार नाहीत,” हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल. ही केवळ मदतीची कृती नाही, तर खरी माणुसकीची जाणीव देणारा प्रसंग आहे.

व्हिडीओखाली लोकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या, “दुसरी व्यक्ती काय अनुभवत आहे हे तुम्हाला कधीच कळत नाही,” म्हणून नेहमी नम्र, दयाळू आणि प्रेमळ राहा. आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले, “गरिबांचे दुःख कोणीही समजत नाही. देव मला इतके श्रीमंत करो की मी सर्वांना मदत करू शकेन.”

हा व्हिडीओ केवळ दयाळूपणाचा संदेश देत नाही, तर माणसांमधील नातं आणि संवेदनशीलता अजून जिवंत आहे हेही सिद्ध करतो. एका छोट्याशा कृतीतून कोणाचं आयुष्य उजळू शकतं, हेच त्याचं खरं सौंदर्य आहे.