Viral Video: जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन माणसांनी नदीत उडी मारून अडकलेल्या माकडाला वाचवले, असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

FPJच्या वृत्तानुसार सोशल मीडियावर टाकलेल्या या व्हिडिओमध्ये दोन माणसं नदीच्या जोरदार प्रवाहात माकडाला वाचवताना दिसतात. सुरुवातीला माकड घाबरलेले दिसते, कारण नदीला पूर आलेला असतो आणि तेवढ्यात त्या माकडाला वाचवण्यासाठी माणसं जवळ येतात. पण जेव्हा माकडाला कळतं की ही माणसं त्याला मदत करत आहेत, तेव्हा ते शांत होतं आणि सहकार्य करतं. खूप प्रयत्नांनंतर माकडाला सुखरूप बाहेर काढण्यात येतं, असं व्हिडिओमध्ये दिसतंय.

व्हायरल व्हिडीओ (Man Saved Monkey Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, जम्मू आणि काश्मीरमध्ये नदीला जोरदार पूर आलेला असताना, एका खडकाळ भागाजवळ एक माकड अडकलेलं दिसतं. त्या माकडाची अवस्था पाहून दोन माणसं त्याला मदत करण्याचा निर्णय घेतात आणि ते नदीत उडी मारून माकडाजवळ जातात. व्हिडिओमध्ये दिसतं की त्यापैकी एक माणूस माकडाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे, तेवढ्यात पाण्याच्या जोरदार वेगामुळे माकड जवळजवळ वाहून जात होते.

ज्या वेळी तो माणूस माकडाजवळ जातो आणि त्याला बुडण्यापासून वाचवतो, तेव्हा माकड थोडं घाबरलेलं असतं आणि त्याला वाटतं की कदाचित माणसाकडून त्याला काही धोका तर नाही ना. दरम्यान, तो धाडसी माणूस थोडा वेळ माकडाला दिलासा देतानाही व्हिडीओमध्ये दिसतोय. माणसाने दिलासा दिल्यानंतर माकड शांत झालं आणि त्या माणसाने माकडाला सुरक्षितपणे खडकांवरून उचललं आणि नदीच्या काठावर सोडलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @abcnews या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच एका युजरने कमेंट करत लिहिलं, “हे खूप सुंदर आहे!! सर्वांनी एकमेकांवर प्रेम करा आणि मदत करा!”
दुसऱ्या युजरने लिहिलं, “मला तो क्षण खूप आवडतो जेव्हा एखाद्या प्राण्याला समजतं की माणूस त्याला मदत करत आहे!” तर एका युजरने कमेंट केली, “अरे बाप रे, हे खूपच छान होतं!!!! त्याला समजायला थोडा वेळ लागला की तो त्याला वाचवायचा प्रयत्न करत आहे! खूपच छान!”