VIRAL VID­­­­EO: हा विषारी साप नव्हे तर केक आहे… पहिल्या नजरेत CAKE पाहून घाबरून गेले लोक

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून सुरूवातीला खरोखर एक विषारी साप असल्याचाच भास होतो. पण ज्यावेळी चाकूने त्याला कापलं जातं त्यानंतर जे दिसून येतं, त्यावर लोकांना विश्वास ठेवणं थोडं अवघड जात आहे.

snake-cake-viral-video
(Photo: Instagram/ sideserfcakes)

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर होत असतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होत असून हा व्हिडीओ पाहून सारेच जण अवाक झालेत. हा व्हायरल व्हिडीओ एका केकचा आहे, जो पाहून पहिल्या नजरेतच तुम्हाला सुरूवातीला एखादा विषारी साप असल्याचा भास होईल. पण तो विषारी साप नव्हे तर फक्त केक आहे हे कळल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. त्यासाठी हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

@sideserfcakes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. सुरूवातीला या व्हिडीओमध्ये पिवळ्या रंगाचा साप बसलेला दिसून येतो. एखाद्या खऱ्याखुऱ्या सापाचा हा व्हिडीओ असावा असं वाटू लागतं. पण ज्यावेळी एक चाकू त्याला कापण्यास सुरूवात होते, त्यावेळी मात्र सारेच जण हैराण झाले. तो खराखुरा साप नव्हे तर सापासारखा दिसणारा केवळ एक केक आहे, हे लक्षात आल्यानंतर नेटिझन्स थक्क झाले. फक्त नेटिझन्सच नव्हे तर जगात वेगवेगळ्या प्रकारचे केक बनविणारे बडे बडे बेकर्स सुद्धा हा व्हिडीओ पाहून अचंबित होऊ लागले आहेत. या स्नेक केकचा हा व्हायरल व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहून सुद्धा लोकांना खराखुरा साप आणि केकमध्ये फरक करणं अवघड जात आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर गेल्या ११ ऑक्टोबर रोजी शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला १.४ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ११ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या स्नेक केकला लाईक केलंय. हा स्नेक केकचा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी या व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. ‘तू कमाल आहे….काय टॅलेंट आहे?’, ‘ मी सुरूवातील खूप घाबरून गेला…OMG’ असे कमेंट्स करत काही युजर्स केक बनविणाऱ्याच्या टॅलेंटचं कौतुक करताना दिसून येत आहेत. तर काही युजर्स हुबेहूब सापासारखा दिसणारा केक पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा स्नेक केक पाहून प्रत्येक जण अंचबित होताना दिसून येत आहे. लोकांना यावर विश्वासच होत नाही की कोणी इतका रिअलिस्टीक स्नेक केक बनवू शकतो. ‘sideserfcakes’ या इन्स्टाग्राम अकाउंटवर यापूर्वी सुद्धा रिअलिस्टिक केकचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वीच जोकरच्या मास्कचा केक बनवला होता. हा केक सुद्धा व्हायरल होत असलेल्या या स्नेक केकसारखा रिअलिस्टिक दिसून येत होता. जोपर्यंत या केकला कापलं गेलं नाही तोपर्यंत तो खराखुरा मास्क असल्याचाच भास होत होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video of snake cake stuns netizens snake cake viral on social media will not be able to differentiate between real and fake snake prp

Next Story
VIDEO: अस्वच्छ खोली १५ मिनिटांत चकाचक
ताज्या बातम्या