प्रेमात पडलेल्या व्यक्तीला काळ, वेळ, स्थळ या कशाचंही भान राहात नाही असं म्हणतात. शिवाय जर कॉलेजमधील मुलांची लव्हस्टोरी असेल तर ते आपल्या प्रेयसीसाठी काय करतील हे सांगता येत नाही. सध्या अशाच एका प्रेमवीराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यावर तुम्हाला हसू आवरणं कठिण होणार आहे.

हो कारण व्हायरल होत असलेला व्हिडीओ खूप मजेदार आहे. ज्यामध्ये एक मुलगा विद्यार्थ्यांनी भरलेल्या क्लासमध्ये आपल्या गर्लफ्रेंडशी गुपचूप फोनवर बोलताना दिसत आहे. तो मान खाली घालून आपल्या गर्लफ्रेंडशी बोलण्यात गुंग असतानाच त्याचे शिक्षक हळूच त्याच्यासमोर जाऊन बसतात, शिक्षक जवळ जाऊन बसल्याचंही या तरुणाला समजत नाही. मात्र, यावेळी क्लासमधले इतर विद्यार्थी हे हा सर्व प्रकार पाहून हळूच हसताना दिसत आहेत.

हेही पाहा- जास्तीच्या पैशांचा मोह नडला! IT कर्मचाऱ्याने एका क्लिकमध्ये गमावले ८४ लाख रुपये

हेही पाहा- कर्मचाऱ्याला अचानक कामावरुन काढून टाकल्याने कोर्टाने बॉसला ठोठावला ३ लाखांचा दंड; कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या हसण्याचा आवाज ऐकताच फोनवर बोलणारा मुलगा वर पाहतो तर त्याला शिक्षक दिसतात. त्यावेळी त्याची परिस्थिती काय झाली हे तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतरच समजेल. तर हे सर्व पाहून वर्गातील विद्यार्थी मात्र मोठमोठ्याने हसताना दिसत आहेत. तर अनेक नेटकऱ्यांनी या शिक्षकाचे कौतुक करत आहेत. कारण त्यांना या मुलाच्या कृत्याचा त्याला राग आला नाही, उलट ते त्याला पाहून हसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ rohitmeena_13 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील देत आहेत. एका नेटकऱ्याने ‘प्यार किया तो डरना क्या’ अशी कमेंट केली आहे.