Boys funny dance video: सोशल मीडियावर आपल्याला दररोज अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. लहान मुलांच्या मस्तीपासून ते कधी त्यांच्या सुंदर हस्याचे. तर कधी थरारक अपघाताचे तर कधी हल्ल्याचे असतात. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकदा हे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येतात. सध्या असाच काही मित्रांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या मित्रांची आठवण येईल. मैत्री हे जगावेगळे नाते आहे. चार मित्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी धमाल करतात. अनेकजण मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात आणि मजा मस्ती करतात. सध्या एका मित्रांचा ग्रुप फिरायला गेला तेव्हा त्यांनी मनसोक्त डान्स केला. या डान्सचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. मित्र हे नेहमीच एकमेकांची मस्करी करत मजा घेत असतात, मग त्याला वेळ काळ, ठिकाण असं काही लागत नाही. अशाच मित्रांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून म्हणाल “मित्रांशिवाय आयुष्य नाही”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हां बघून तोल माझा गेला. तुम्हां बघून तोल माझा गेला. तुमी सावराया गपकन आला. या गाण्यावर तुफान डान्स केला आहे. या तरुणांनी रस्त्याच्या कडेला कार पार्क केली आणि मोठ्या आवाजात रस्त्यावर मनसोक्त नाचायला सुरुवात केली. हा तरुणांचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थिरकायला लागाल. हे तिघही बेभान होऊन आपल्याच नादात नाचत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>प्रेमासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा सचिनसोबत बेडरुममध्ये धमाकेदार डान्स; VIDEO तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ balaji_28m नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत. एकानं म्हंटलंय, “आयुष्य हे डॉक्टरांच्या गोळ्या घेऊन नाही तर् मैत्रिणींच्या टोळ्या घेऊन जगायचं असतं” तर दुसरा म्हणते, “आयुष्यात मित्रांची जागा कोणीच घेऊ शकत नाही.”