Washing Machine Blast Video: आजकाल सगळ्यांकडेच वॉशिग मशीनचा वापर केला जातो. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात बहुतेक लोक हाताने कपडे धुणं टाळतात. मशीनमध्ये एकदा कपडे लावले की ते चांगले स्वच्छ होऊन निघतात. यात वेळ आणि मेहनतही वाचते. त्यामुळे लोक वॉशिंग मशीनच वापर जास्त प्रमाणात करतात. पण कोणतीही मशीन असो आपण जर त्याचा वापर नीट केला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा केला तर त्याची खूप किंमत मोजावी लागू शकते एवढंच नाही तर ते आपल्या जीवावरही बेतू शकतं.

सध्या असाच काहीस प्रकार एका ठिकाणी घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात वॉशिंग मशीनचा अचानक स्फोट झाल्याचं दिसून येतंय. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…

वॉशिंग मशीनचा स्फोट (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक धक्कादायक घडना घडल्याचं दिसून येतंय. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका पब्लिक लॉंड्रीमधून एक माणूस हातात दोन ते तीन पिशव्या घेऊन बाहेर पडताना दिसतोय. बाहेर पडताच क्षणी अचानक वॉशिंग मशीन बिघडते, जोरजोरात फिरू लागते आणि मशीनचा स्फोट होऊन त्याला आग लागते. हा स्फोट इतका भीषण झाला की, मशीनचे तुकडे-तुकडे झाले शिवाय त्या लॉंड्री सेंटरचेही मोठे नुकसान झाले. कपड्यांमध्ये फोन असल्यमुळे हा स्फोट झाला असावा असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @aniket.patil.official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “याला म्हणतात नशीब, एका सेकंदात जीव वाचला” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.४ मिलियन व्हयुज आले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्या कपड्यामध्ये फोन राहिला असेल” तर दुसऱ्याने “देव तारी त्याला कोण मारी” अशी कमेंट केली. तर एकाने “नशीब होतं म्हणून वाचला” अशी कमेंट केली.