Viral video: आपल्या वाचण्यात अथवा ऐकण्यात कायम अनेक चोरीच्या घटना येत असतात. काळानुरूप चोरीच्या पद्धती बदलल्या, तसेच चोरीचे नवनवीन हातखंडेदेखील बदलत आहेत. मात्र, सध्या एक धक्कादायक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. कारण एका महिलेनं हद्दच पार केली आहे. या महिलेनं ज्या वस्तूची चोरी केली आहे ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. आता प्रश्न उपस्थित होतोय की, या महिलेने नेमकी चोरी कशाची केली? तर याचं उत्तर ऐकून तुम्हाला निश्चित आश्चर्य वाटेल. कारण तिने चक्क सार्वजनीक ठिकाणी ठेवलेला बाकच उचलून चोरुन नेला आहे. तुमचाही विश्वास बसत नाही ना मग हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा.

लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोर हा चोर असतो मग तो पुरुष असो वा स्त्री. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका इमारतीच्या बाहेर असलेला बाक दिसत आहे. या बाकाचा उपयोग लोकांना बसण्यासाठी होतो. या व्यतिरीक्त या बाकाचा वापर करता येणार नाही किंवा या बाकामुळे कोणाला कोणता फायदा होईल, असे ही नाही. म्हणूनच चोरी होण्याचा प्रश्नच नाही. मात्र सध्या व्हिडिओत तुम्ही पाहिले तर व्हिडिओत एक महिला इमारतीत बाक ठेवलेल्या जागी येते आणि जरा सर्वत्र पाहते,त्यानंतर संधीचा फायदा घेत संपूर्ण बाक खांद्यावर उचलून घेते आणि तिथून पळून जाते. मात्र महिलेचा हा कारनामा तिथे लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sutta_gram नावाच्या इनस्टाग्राम अकांउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “अशा महिलांचं करायचं तरी काय? पण हे अत्यंत लाजिरवाणं आहे.” तर आणखी एकानं, वह स्त्री है वह कुछ भी कर सकती है अशी प्रतिक्रिया दिली आहे.