scorecardresearch

‘मैने पायल है छनकाई’ गाण्यावर महिलेने असा ताल धरला की…तुम्हालाही थिरकण्याचा मोह आवरणार नाही

अनेकांना डान्सची आवड असली तरी काही लोक आपल्या जबरदस्त स्टाइलने लोकांच्या मनावर राज्य करतात. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनत आहे ज्यामध्ये एक महिला ‘मैने पायल है छनकाई’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

‘मैने पायल है छनकाई’ गाण्यावर महिलेने असा ताल धरला की…तुम्हालाही थिरकण्याचा मोह आवरणार नाही
photo(social media)

बॉलिवूड गायिका नेहा कक्करचे ‘ओ सजना’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. ज्याला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. नेहा कक्करने बनवलेले हे गाणे यूट्यूबवर आतापर्यंत १८ मिलियन पेक्षा जास्त म्हणजेच १ कोटी ८० लाख वेळा पाहिले गेले आहे. अनेकजण यावर रील्स आणि शॉर्टस देखील बनवत आहेत. असाच एक रील व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. जो सोशल मीडियावर तुफान धुमाकुळ घालतोय.

अनेकांना डान्सची आवड असते. काही लोक आपल्या जबरदस्त स्टाइलने लोकांच्या मनावर राज्य करतात. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनत आहे ज्यामध्ये एक महिला ‘मैने पायल है छनकाई’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे की, या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

( हे ही वाचा: वनकर्मचाऱ्यांनी घडवून दिली हरवलेल्या हत्तीच्या पिल्लाची आईशी भेट; माता हत्तीने देखील दिला सोंडेने आशीर्वाद)

येथे महिलेचा जबरदस्त डान्स पाहा

( हे ही वाचा: Video: माणूस घेत होता चित्त्याबरोबर सेल्फी, नंतर झाले असे की…. पाहून तुमचाही थरकाप उडेल)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला ‘मैने पायल है छनकाई’वर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. ही महिला साडी नेसून अशा पद्धतीने नाचत आहे की मोठमोठ्या डान्सरना देखील जमणार नाही. लोकांना तिचा अभिनय सर्वाधिक आवडला आहे. व्हिडिओची पार्श्वभूमी पाहता हा व्हिडिओ महिलेने तिच्या घराच्या टेरेसवर शूट केल्याचे समजते. एमआरएस पाटील असे या महिलेचे नाव असून ती युट्युबर आहे.

गायिका नेहा कक्करने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी एम.आर.एस. पाटील यांच्यासाठी खास मेसेजही लिहिला आहे, ‘तुझ्यावर खूप प्रेम, असेच आयुष्याचा आनंद लुटत राहा.. तुमच्यासारख्या लोकांना अशा प्रकारे नाचताना पाहून मला खूप आनंद होतो, विशेषत: मातांना कारण ते आयुष्यभर टिकून राहतील. ती काम करते. त्यामुळे स्वतःसाठी वेळ शोधू शकत नाही. बातमी लिहेपर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या