arental Negligence Viral Video :आजच्या सोशल मीडियाच्या युगात, पालकांनी आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी नेहमीच उत्सूक असतात. आजकाल लहानमुलांचे देखील सोशल मिडिया अकाऊंट तयार केले जातात आणि त्यांना जन्मत:च इन्फ्युएन्सर बनवले जाते. पण हे सर्व करताना पालकांना अत्यावश्यक जबाबदारीचा विसर पडतो जे अनेकदा इतका घातक ठरतो की, त्याचा थेट परिणाम मुलांच्या जिवावर होतो. असंच एक धक्कादायक उदाहरण अलीकडे चीनमध्ये घडलं, जिथे केवळ एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे एक लहान मुलगी थेट पाण्यात पडली आणि तिच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ही घटना केवळ अपघात नव्हे, तर पालकांच्या बेपर्वाई वर्तन दर्शवत आहे. मुलांची काळजी घेणं, हे प्राथमिक कर्तव्य असूनही, काही पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. फोटो, व्हिडीओच्या नादात अनेकदा पालक मुलांची जीव धोक्यात टाकतात.
चीनमधील गुइझोउ प्रांतातील प्रसिद्ध शिआओचिकॉन्ग धबधब्यावर नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कुटुंबाने धबधब्याजवळ फोटो काढण्यासाठी थांबले होते. फोटोसाठी पोज देताना त्यांचे फक्त मुलावर लक्ष केंद्रित होते. मुलाला फोटमध्ये घेण्यासाठी आईवडील खेचतात पण हे करताना तिथेच उभी असलेल्या मुलीला धक्का लागतो अन् ती पाण्यात पडते. या हलगर्जीपणाचा परिणाम असा झाला की, ती चिमुरडी थेट पाण्यात पडली अन् तिच्या जीवाला धोका निर्माण झाला. सुदैवाने तिने वेळीच एका दगडाला पकडून आपला जीव वाचवला. अन्यथा, ती प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यात वाहून जाऊन गंभीर दुर्घटना घडली असती.
आजच्या ‘परफेक्ट फोटो’च्या हव्यासात काही पालक इतके गुंग होतात की, त्यांना आपल्या मुलांचं खरं सुरक्षितकडेही दुर्सक्ष करतात. हा व्हायरल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर संताप निर्माण करत आहे – जिथे आई-वडिलांनी फोटोसाठी मुलावर लक्ष केंद्रीत करताना दुसऱ्या लहान मुलीला पाण्यात पडू दिलं. क्षणाचाही उशीर झाला असता, तर तिचा जीवही जाऊ शकला असता. अनेकांनी पालकांच्या निष्काळजीपणावर टीका केली असून, काहींनी याला “पालकत्वाचा अपमान” ठरवलं आहे.
“पालकांनी सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणं अत्यावश्यक आहे. केवळ सोशल मीडियासाठी फोटो किंवा व्हिडीओ काढताना मुलांच्या सुरक्षेचा पूर्ण विचार न करणे ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे.” असेही मत अनेकांनी व्यक्त केले.
फोटोवर कमेंट करताना एकाने लिहिले की, अशा ठिकाणी भेट दिल्यावर मुलांचे फोटो सुरक्षित ठिकाणी काढले पाहिजे. मी मुलांना अशा ठिकाणी कधीही घेऊन जाणार नाही.
दुसऱ्याने लिहिले की, “आजच्या काळात लोकांना अशा पद्धतीने फोटो घेण्याची खूप वाईट सवय आहे. फोटो आणि व्हिडीओज काढण्याच्या नादात लोकांचे आयुष्य कमी होत आहे”
तिसऱ्याने लिहिले की,”ते पालक अत्यंत क्रूर आहेत. तिथे सुरक्षेसाठी कोणतेही कूंपण नाही, पाणी इतके जवळ आहे.”
चौथ्याने कमेंट केली की, “मुलीऐवजी मुलांकडे जास्त लक्ष देणे हे काही एका दिवस घडलेली गोष्ट नाही. काळ कोणताही असो हे मत बदलणार नाही.”
पाचव्याने लिहिले की, त्यांचे हे वागणे छोट्या मुलीला दुखावणारे होते. त्यामुळे तिला लाज वाटू शकते. असे पालक खरोखरच अक्षम असतात.