Viral Video Parents Get Emotional : बालपणी डॉक्टर, इंजिनीयर होण्याचे किंवा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न आपण सगळेच पाहतो. पण, मोठे झाल्यावर हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागते, रात्रंदिवस जागे राहून अभ्यासही करावा लागतो. यादरम्यान स्वतःला दररोज सिद्ध करून दाखवावे लागते. हे सगळे करीत असताना आपल्यावर विश्वास ठेवणारे, स्वप्नांना पाठिंबा देणारे आणि दिवस-रात्र आपल्याबरोबर जागे राहणारे फक्त कुटुंबातील मंडळी आणि आई-बाबाच असतात. तर, आज सोशल मीडियावर असेच काहीसे दाखविणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओत कुटुंबातील सदस्य मुलाचा रिझल्ट लागण्याची वाट पाहत असतात. मुलाने डॉक्टर होण्यासाठी परीक्षा दिलेली असते आणि आज त्याचा निकाल लागणार असतो. तर यासाठी सगळेच लॅपटॉपकडे अगदी टक लावून बघत असतात. त्यादरम्यान निकाल लागतो आणि मुलगा डॉक्टरच्या परीक्षेत पास होतो. हे समजताच कुटुंबातील मुले आनंदाने नाचण्यास सुरुवात करतात. पण, आई-बाबा अगदी निरागसपणे लॅपटॉपकडेच बघत राहतात. त्यांना आपला मुलगा पास झाला आहे या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो.

बाबांचे रिॲक्शन मस्त होते (Viral Video)

मग आई-बाबांना कुटुंबातील मुले लॅपटॉपकडे बोट दाखवून समजावून सांगतात. त्या क्षणी आई-बाबांचा विश्वास बसतो. बाबांचे डोळे अगदी अश्रूंनी भरून येतात; तर आईच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत असल्याचे दिसते. कुटुंबातील सगळेच मुलाला पास झाल्याबद्दल त्यांच्या अंदाजात शुभेच्छा देताना दिसतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद हे सांगतोय की, मुलाच्या कष्टाचे आणि आई-बाबांच्या विश्वासाचे चीज झाले. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @trolls_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘तुमच्या पालकांना अभिमान वाटतो की, याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “बाबांची रिॲक्शन मस्त होती”, “या दिवसाची अनेक जण वाट पाहत असतात”, “सर्व वडील सारखेच असतात; त्यांना मुलगा पास झाला आहे यावर विश्वासच बसत नाही” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.