Viral Video Passenger Uses Personal Cooler In Indian Railways : भारतात असंख्य नागरिक रेल्वेने प्रवास करतात. सण-उत्सवाचा काळ तर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आणखीन वाढते. त्यातच अनेकांचा लोअर बर्थला बसण्याचा आग्रह असतो. कारण – रेल्वेच्या अपर बर्थला बसण्याचा कंटाळा आणि दुसरीकडे पंख्याची हवा न लागणे अशा समस्याही उद्भवताना दिसतात. पण, या समस्येवर एका माणसाने जबरदस्त उपाय शोधून काढला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये कोणालाही त्रास न देता त्याने स्वतःचा मार्ग निवडला आहे.

रेल्वेच्या स्विच पॅनलचा उपयोग सहसा मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करण्यासाठी वापरला जातो. पण, व्हिडीओत प्रवासी रेल्वेमध्ये अपर बर्थला झोपलेला दिसतो आहे. यादरम्यान तो फक्त झोपला नाही आहे तर त्याचा वैयक्तिक कुलर सुद्धा बरोबर घेऊन आला आहे. रेल्वेमध्ये त्याच्या वरती ३ पंखे चालू स्थितीत असतानाही त्याने डोक्याच्यावर हा कुलर चालू करून ठेवला आहे. हे दृश्य शेजारच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाने पाहिले आणि व्हिडीओ स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला.

ट्रेनमध्ये आणला कूलर (Viral Video)

ट्रेनच्या स्विच पॅनलवरून फक्त मोबाईल, लॅपटॉप, पॉवर बँक इत्यादी कमी पॉवर असलेल्या उपकरणांना चार्ज करण्याची परवानगी आहे. पण, स्विचमध्ये जास्त पॉवर असणारी उपकरणे चार्ज केल्यास दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. कूलर देखील जास्त पॉवर असणारा डिव्हाइस आहे; म्हणून ट्रेनमध्ये कूलर वापरणे सुद्धा गुन्हा मानला जातो. कूलरला हाय-व्होल्टेज पॉवरची आवश्यकता असते; जी ट्रेनच्या पॉवर सॉकेटमध्ये दिली जात नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा बघाच…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Taza_Tamacha या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शमध्ये “या जगात कोणत्या कोणत्या पद्धतीचे लोकं असतात बघा. टीटीईने बघितले तर चांगला दंड ठोठावला असता” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. तसेच व्हिडीओ पाहून नेटकरी “नवीन घेऊन जात असेल त्यामुळे रस्त्यात त्याचा वापर करून पहिला असेल”, “२३० व्होल्टवर चालणारी उपकरणे रेल्वेमध्ये उपलब्ध असलेल्या वीज पुरवठ्यावर चालू शकतात का? नाही. असे दिसते की, फक्त हे रीलसाठी बनवले जात आहेत” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत…