Viral Video Parrot Turns Security Guard : अनेकदा सार्वजनिक ठिकाणी, दुकानात, तर राहत्या घरात मौल्यवान सामान, वस्तू चोरल्या जातील अशी भीती प्रत्येकाच्या मनात असते. कारण – अनेकदा चोरटे अंधाराचा फायदा घेत, चोरी करून पळ काढतात आणि मग मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे काही जण आधीच खबरदारी घेऊन दुकानात, घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतात; जे अशा चोरांवर लक्ष ठेवण्यास मदत करतात. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो पाहून तुम्ही थक्क व्हाल.
घरात चोरी होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशातच व्हायरल व्हिडीओत मध्यरात्री एक चोर शिरतो. चोर खिडकीतून आतमध्ये येतो. घरात कोणीच नसते असे त्याला वाटते. पण, मग घराच्या हॉलमध्ये अगदी कोपऱ्यात पाळीव पोपट बसलेला असतो. चोराला खिडकीतून आतमध्ये उडी टाकलेली पाहून पोपट जोरजोरात विठू विठू करायला सुरुवात करतो. पोपटाचा आवाज ऐकून चोर घाबरतो आणि थेट खिडकीतून बाहेर उडी टाकून पळून जातो.
आता सिक्युरिटी गार्डची गरजच नाही (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, पोपटाचा आवाज ऐकून घराची मालकीण धावत हॉलमध्ये येते. तोपर्यंत चोर निघून गेलेला असतो. पण, सीसीटीव्हीमध्ये पाहिल्यानंतर कुटूंबातील सदस्यांनाही पोपटाचे कौतुक वाटते. आतापर्यंत तुम्ही अनेक सिक्युरिटी गार्ड, श्वान यांनी चोरांपासून इतरांचे संरक्षण करताना पाहिले असेल. पण, पोपटाने केलेली कमाल तर सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे. घराचे रक्षण करणाऱ्या पोपटाची कमाल व्हिडीओतून तुम्हीही बघा…
व्हिडीओ बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Digital_khan01 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “चोर आत येताच त्याने विठू विठू करायला केली सुरुवात; किती मस्त सिक्युरिटी गार्ड आहे” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून पोपटाचे कौतुक करत “हा तर सीसीटीव्हीपेक्षा फास्ट आहे”, “आता सिक्युरिटी गार्डची गरजच नाही”, “असा सिक्युरिटी गार्ड प्रत्येकाने घरी ठेवला पाहिजे”, “सीसीटीव्हीपेक्षा बेस्ट”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.
