Police Officer Helping Disabled Man To Board Train : आजच्या धावपळीच्या जगात लोक माणुसकी कुठेतरी विसरून गेले आहेत. अनेकदा परिस्थिती समजून न घेता समोरच्याचा वाईट प्रसंगी त्याचा फायदा घेतला जातो. पण, म्हणतात ना ”सुख तुम्हाला झोपवतं, तर दुख जागवतं” असं म्हणतात. एखाद्याला जिन्यावरून उतरायला मदतीचा हात जरी दिला तरीही दिवसभर त्या गोष्टीचा आनंद मनात राहतो आणि घरच्या मंडळींना किंवा अगदी मित्र-मैत्रिणींना चुकूनही उलट बोललो तर रात्री सतत आठवून झोपही लागत नाही. पण, आज माणुसकीचा असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो पाहून तुम्हीही भारावून जाल.

एका अपंग व्यक्तीला ट्रेनमध्ये चढायचे असते. ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागलेली असते. पण, अपंग असल्यामुळे इतरांप्रमाणे धावत जाऊन ट्रेन पकडणे शक्य नसते. तर उत्तर प्रदेशचे पोलीस अधिकारी अश्वनी कुमार रेल्वे स्टेशनवर पायऱ्या उतरण्यासाठी धडपडणाऱ्या त्या माणसाला बघत होते आणि अडचण पाहून त्याच्या मदतीला धावले. त्याने त्या माणसाला हळूवारपणे खांद्यावर उचलले आणि प्रवाशांची गर्दी असणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यास मदत केली.

“दया आणि माणुसकी प्रत्येकामध्ये नसते” (Viral Video)

बघायला गेलं तर मदत करण्यासाठी पैशांची गरज नसते; फक्त काळजी करणारे हृदय महत्वाचे असते आणि त्या काळजी करणाऱ्या हृदयात एखाद्याचे दुःख कमी करण्याची ताकद असायला हवी एवढेच महत्वाचे असते; जसे या पोलीस अधिकाऱ्याने केले आहे. पायऱ्या उतरण्यासाठी अडचण येणाऱ्या अपंग माणसाला हळूवारपणे खांद्यावर उचलले आणि प्रवाशांची गर्दी असणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यास मदत केली. पोलीस अधिकाऱ्याची माणूसकी व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ashmalikupcop या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये “माणुसकीपेक्षा काहीही मोठे नाही” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा भावूक झाले आहेत आणि “दया आणि माणुसकी प्रत्येकामध्ये नसते”, “मी पहिल्यांदाच असं कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला करताना पाहिले आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.