Viral Police Humanity Video: रस्त्यावर घडलेली एक साधीशी घटना सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. दिसायला अगदी रोजच्या जीवनातील गोष्ट; पण त्यातील माणुसकी, करुणा व समजूतदारपणाचा नमुना पाहून हजारो लोकांचे डोळे पाणावले आहेत. हा व्हिडीओ इतका भावनिक आहे की, पाहणाऱ्याचं हृदय जिंकून घेईल.

रस्त्याच्या मध्यावर उभी असलेली स्कुटी ‘टो’ करून नेली जाते. मालकिणीचे डोळे पाणावतात… आवाजात थरथर, चेहऱ्यावर असहायता… आणि पुढच्याच क्षणी जे घडलं, ते पाहून तिथे उभा असलेला प्रत्येक जण थबकून जातो. नियमांची कठोर अंमलबजावणी करीत असलेले पोलिस अचानक मानवी चेहरा दाखवतात आणि हा क्षण सोशल मीडियावर असा पसरतो की, हजारो लोकांच्या मनात पुन्हा एकदा “माणुसकी अजून जिवंत आहे” ही आशा जागी होते.

घटना अशी की, दोन तरुणी त्यांच्या स्कुटी रस्त्याच्या कडेला चुकीच्या पद्धतीने उभी करतात. पार्किंगच्या नियमांची तमा न बाळगता, स्कुटी थेट रस्त्यावर लावल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येताच, ते क्षणार्धात घटनास्थळी पोहोचतात. नियमाप्रमाणे दोन्ही स्कूटी जप्त करून थेट पोलीस ठाण्याकडे निघतात.

पोलिसांच्या या कृतीने घाबरलेल्या दोन्ही तरुणींचा जीव अक्षरशः टांगणीला लागतो. त्या लगेच पोलिसांकडे धाव घेतात, हात जोडून माफी मागतात, “आता पुढे अशी चूक होणार नाही” अशी हमी देतात. त्यांच्या डोळ्यांत अश्रू, आवाजात घाईगडबड व चेहऱ्यावर असहायतेची छटा हे सर्व पाहून उपस्थितांचा गळा दाटून येतो.

सुरुवातीला पोलिसांचा चेहरा कठोर असतो. नियम म्हणजे नियम या भावनेनं ते वागत असतात; पण तरुणींची ती अवस्था पाहून त्यांचंही मन द्रवतं. कायद्याचा कठोर चेहरा बाजूला ठेवून, ते मानवी चेहरा धारण करतात. माणुसकीच्या नात्यानं अखेर त्यांनी फक्त कडक समज देऊन स्कुटी परत करतात.

आणि हो, ही संपूर्ण घटना तेव्हा अधिक खास झाली जेव्हा तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने ती मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाला आणि क्षणात व्हायरल झाला. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहून पोलिसांच्या माणुसकीला सलाम केला. “नियम पाळा; पण माणुसकी सोडू नका” हा संदेश या घटनेतून सगळ्यांना मिळाला.

तरीही, या व्हिडीओतील शहर कोणतं हे अजून उघड झालेलं नाही. पण एक गोष्ट ठाम आहे, नियमांची अंमलबजावणी आणि माणुसकी, दोन्ही एकत्र नांदू शकतात हे या घटनेनं सिद्ध केलं. आणि अशा निर्णयांनीच खरा विश्वास निर्माण होतो.
रस्त्यावरील ही घटना फक्त वाहतुकीचा किस्सा राहिली नाही, तर मानवतेचा धडा ठरली.