Viral Video Man Throws Surprise Party For Father : आपण चांगल्या मार्कांनी पास झालो की, बाबांच्या डोळ्यात नकळत पाणी यायचे. निकाल लागला रे लागला शाळा, कॉलेजमधून येतानाच मिठाईचा बॉक्स घरी यायचा आणि चाळीत, बिल्डिंगमध्ये वाटला जायचा. हे सगळे दिवस आठवले की, आपसूकच चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी येत ना?… पण, आज असा एक अनोखा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये लेकाचा नाही तर बाबाच्या आयुष्यातील एक खास दिवस सेलिब्रेट केला जातो आहे.
मुंबईतील एका ५२ वर्षीय व्यक्तीने एमबीएची पदवी मिळवली आणि त्याच्या मुलाने हा खास क्षण साजरा करण्यासाठी एक जबरदस्त पार्टी आयोजित केली; जी आजवर कोणीच पहिली नसेल. बाबांच्या चेहरा आणि चेहऱ्यावर ग्रॅड्युएशनची टोपी असा मास्क बनवून घेतलेला असतो आणि तो कुटुंबातील सगळे सदस्य घालतात. त्यानंतर बाबांची घरात एंट्री होते.
त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून गेला (Viral Video)
व्हिडीओत तुम्ही पहिले असेल मजेशीर मास्क आणि घरात भिंती रंगीबेरंगी स्टिकी नोट्सने सजवलेल्या असतात. बाबा घरात येताच ग्रॅड्युएशन पूर्ण केल्याचा आनंद कुटुंब आणि त्यांच्या मित्रांना सुद्धा आहे हे पाहून आणखीन उत्साही होतात. तसेच सरप्राईज पाहून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद तर अगदी बघण्याजोगा असतो. भितींवर लावलेली प्रत्येक स्टिकी नोट्स ते अगदी लक्षपूर्वक वाचतात.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ लेक मैत्रेय साठे याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “पदवीधर” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “इथे मी ३५ व्या वर्षी एमबीए पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. मला काकांकडून प्रोत्साहन हवे आहे”, “अभिनंदन काका”, “त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्व काही सांगून जातो आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत…