‘दुसऱ्या ग्रहाच्या’ रहस्यमय ढगांनी झाकले अर्जेंटिनाचे आकाश, आश्चर्यकारक दृश्य पाहून लोक घाबरले, पाहा VIRAL VIDEO

आकाशात जणू काही पांढऱ्या कापसाचे गोल गोल महाकाय बोळे जमा झाल्यासारखं चित्र दिसून आलं. ढगांचं हे दुर्मिळ चित्र पाहून लोकांची झोपच उडाली. हा व्हिडीओ पाहून सारेच जण चक्रावून गेले आहेत. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

cotton-ball-clouds-spotted-in-argentina-viral-video (1)
(Photo: Youtube/ Meteored)

अर्जेंटिनाच्या आकाशात रहस्यमयी ढग जमा झालेले पाहून लोक घाबरून गेले. आकाशात जणू काही पांढऱ्या कापसाचे गोल गोल महाकाय बोळे जमा झाल्यासारखं चित्र दिसून आलं. ढगांचं हे दुर्मिळ चित्र पाहून लोकांची झोपच उडाली. ढगांचे मोठमोठ्या आकाराचे गोळे आकाशात तरंगत असल्याचं पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करू लागले. या रहस्यमयी ढगांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ पाहून सारेच जण चक्रावून गेले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा विचारात पडाल. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

आकाश कापसाचे महाकाय बोळे तरंगल्यासारखं दृश्य

आकाशात एखाद्या पांढर्‍या लोकरीच्या गोळेच तंरगू लागले आहेत, असं भासवणारे हे लाखो ढग बघायला खूप सुंदर वाटत होते. मात्र, अतिशय सुंदर दिसणारे ढगांचे हे गोळे जोरदार वादळाचा इशारा देत होते. हे पाहून लोक अक्षरशः घाबरून गेले होते. गेल्या १३ नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनामधील ग्रांडे इथल्या कॉर्डोबामध्ये आकाशात ढगांचे रहस्यमयी आकारात लाखो महाकाय गोळे दिसले. या अनोख्या दृश्याचा व्हिडीओ गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलाय. त्यानंतर कापसाच्या महाकाय गोळ्यांप्रमाणे दिसणाऱ्या या ढगांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला.

ढगांचे हे विचित्र महाकाय गोळे पाहून हजारो लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. विचित्र आकातारील हे महाकाय ढग पाहून लोकांमध्ये भिती निर्माण झाली होती. हे चित्र फारच भयंकर असल्याचं देखील सांगत होते.

जोरदार वाऱ्यासह भयानक पाऊस

लोक म्हणतात की, शनिवारी दुपारी या विचित्र ढगांनी आकाश व्यापून गेलं होतं. जणू काही एखाद्या वेढ्यात अडकून पडल्यासारखं वाटत होतं, असं लोक म्हणाले. पण काही वेळाने खूप जोराचा वारा वाहू लागला आणि मग ढगांचा जोरजोरात आवाज येऊ आला. लोक म्हणाले की, हे दृश्य फार घाबरवणारं होतं आणि आकाशातून जणू काही मोठमोठ्या दगडांचा पाऊस आमच्या घराच्या छतावर पडणार असल्याचं वाटू लागलं होतं.

आकाशातून गारा पडू लागल्या…

अनेक भागात पावसादरम्यान गारपीटही झाली. यामुळे लोकांच्या मनात अधिक भितीचं चित्र निर्माण झालं. लोकांना वाटलं की गारांचा आकार हळूहळू वाढत जाणार आणि हे मोठ-मोठ्या आकारांचे गारे त्यांच्या घराचे छप्पर फोडून आपला जीव घेतील, अशी भिती तिथल्या लोकांना वाटू लागली. पण काही लोक असेही होते ते या विचित्र ढगांचा असा आकार पाहून खूप आनंदी झाले होते. आकाशातील ही विचित्र घटनाही अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे. ढगांचे हे अद्भुत गोळे पाहून एका व्यक्तीनं म्हटलं आहे की, “असे ढग मी आतापर्यंत पाहिलेला सर्वोत्तम देखावा होता”. तर, दुसर्‍या व्यक्तीने म्हटले आहे की, “हे खूपच भयानक आहे. तरीही मी दिवसभर ते बघत राहिलो.”

आणखी वाचा : बाबो! ही महिला भिकारी फाडफाड इंग्रजी बोलतेय ! कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतलीय; पाहा VIRAL VIDEO

‘ते दुसऱ्या ग्रहाचे ढग होते’

ढगांचे हे रहस्यमय गोळे पाहून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिली की, “हे ढगांचे गोळे दुसऱ्या ग्रहाचे असू शकतात”. त्याच वेळी, अनेक युजर्सनी ढगांचा हा आकार खूपच विचित्र पण खूप सुंदर असल्याचं म्हटलं आहे. एक व्यक्ती म्हणाली, “ते ढग अजिबात दिसत नाही. दगडांसारखे दिसणारे हे ढग एका पॅटर्नसारखे बनवले गेले होते आणि ते आकाशात दूरवर पसरले होते.” दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलं की, “हे खूप आश्चर्यकारक आहे की हे ढगांचे गोळे परफेक्ट बनले आहेत”.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बहिणीच्या सासरी आला होता…रात्रभर ओलीस ठेवून मारहाण केली आणि मग पहाटेच जबरदस्तीने लग्न लावून दिलं

आणखी वाचा : विद्यार्थीनीने शिक्षिकेच्या कानशिलात लगावली; नंतर शिवीगाळ करू लागली; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

अशा आकाराचे ढग कसे तयार होतात?

तज्ज्ञांच्या मते, असं मानलं जातं की जेव्हा ढगांमध्ये बर्फ आणि पाण्याच्या कणांचे प्रमाण जास्त असतं तेव्हा ढगांमध्ये आकार तयार होऊ लागतो. तज्ज्ञांच्या मते, बर्फाच्या कणांच्या मुबलकतेमुळे ढगांवर इतका दाब असतो की, ते पिशवीसारखे लटकतात. अनेक तज्ञांनी असेही सांगितले की, आकाशात असे ढग दिसणे म्हणजे मुसळधार पावसासह जोरदार गारपीट होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते आणि अनेकदा असे ढग वादळापूर्वी आकाशात तयार होतात आणि नंतर पावसाच्या वेळी विजा पडतात. अशा दुर्मिळ ढग निर्मितीला ‘मॅमॅटस क्लाउड’ म्हणतात. मॅमॅटस ढग ही सर्वात असामान्य आणि विशिष्ट ढगांची निर्मिती आहे ज्यामध्ये दुसर्‍या ढगाच्या पायथ्यापासून फुगवटा तयार होतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video rare cotton ball like clouds spotted in argentina sky full of cotton wool clouds mammatus clouds from another planet google trending video prp

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या